BCCI Media Rights 2023-27 : अखेर नवा ब्रॉडकास्टर मिळणार! बीसीसीआय 12 हजार कोटी रूपये कमवणार?

BCCI Media Rights 2023-27
BCCI Media Rights 2023-27esakal
Updated on

BCCI Media Rights 2023-27 : बीसीसीआयला अखेर नवा ब्रॉडकास्टर मिळणार आहे. याबाबतची टेंडर प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होईल असे बीसीसीआयचे पार्टनर Ernst & Young यांनी सांगितले आहे.

संभाव्य ब्रॉडकास्टरपर्यंत ही माहिती पोहचवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. ब्रॉडकास्टर प्रक्रिया ही 19 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येईल. आणि भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेपूर्वी बीसीसीआयला नवा ब्रॉडकास्टर मिळण्याची शक्यता आहे.

BCCI Media Rights 2023-27
Rishabh Pant IPL 2024 : ऋषभ पंतचा नेटमध्ये सराव, तरी आयपीएलला मुकणार... इशांत शर्मा असं का म्हणतोय?

इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार पूर्वी ही डील 4 वर्षासाठी करण्यात येणार होती मात्र आता ही डील 5 वर्षांसाठी होणार आहे. मात्र क्रिकबझच्या रिपोर्टनुसार याबाबत अजून ब्रॉडकास्टर्सला माहिती देण्यात आलेली नाही. ही लिलाव प्रक्रिया इ - लिलाव प्रक्रियेद्वारे पार पाडण्यात येईल अशी शक्यता आहे. बीसीसीआयने आयपीएल प्रसारण इ लिलावात तब्बल 48,390 कोटी रूपये कमवले आहेत. (BCCI Media Rights Auction)

बीसीसीआय प्रसारण हक्क टेंडरमधील महत्वाचे मुद्दे

  • नवीन प्रसारण हक्काची डील ही आयपीएलप्रमाणे 5 वर्षासाठी होणार आहे.

  • डिजीटल आणि टीव्ही हक्क हे वेगवगेळ असणार आहेत. डिजीटल प्रेक्षक संख्या चांगली वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • लिलावाची प्रक्रिया ही क्लोज बिडिंग ऐवजी इ ऑक्शनद्वारे राबवण्यात येईल.

  • नव्या प्रक्षेपण हक्कामध्ये नक्की किती सामने समाविष्ट आहेत हे अजून नक्की झालेले नाही. मात्र यात जवळपास 100 द्विपक्षीय सामन्यांचा समावेश असू शकतो.

  • नव्या सायकलमध्ये टी 20 सामन्यांची संख्या वाढली असून वनडे सामन्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. वनडेमध्ये प्रेक्षकांना कमी रस असल्याचे दिसून आले आहे.

BCCI Media Rights 2023-27
IND Vs BAN : 'तुमच्याबरोबर पंचांनाही बोलवा...' हरमनचा 'तो' टोमणा, बांगलादेश कर्णधाराचा संयम तुटला अन्...

गेल्या प्रसारण हक्क लिलावात डिस्ने - स्टारने 103 सामन्यांसाठी 6138.10 कोटी रूपये दिले होते. प्रत्येक सामना हा 61 कोटी रूपयांना पडला होता. आता बीसीसीआयने डिजीटल आणि टीव्ही हक्क वेगवेगळे केल्यामुळे बीसीसीआयला 12000 कोटी रूपये मिळण्याची अपेक्षा आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()