Ireland Tour of India Jasprit Bumrah : आता या वर्षातील उरलेले दिवस टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचे आहे. प्रथम आशिया कप आणि नंतर विश्वचषक 2023 मध्ये सहभागी होणार आहे. अशा स्थितीत बीसीसीआयला आपल्या खेळाडूंच्या कामाचा भार नीट सांभाळावा लागेल, अन्यथा त्यांच्या दुखापतीमुळे संघ व्यवस्थापनाची चिंता वाढू शकते.
दरम्यान, पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहकडे आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाची कमान सोपवण्यात आली आहे. पण, बीसीसीआयला या निर्णयाचा आणखी पश्चाताप करावा लागू शकतो.
11 महिन्यांनंतर पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहकडे भारतीय क्रिकेट बोर्डाने टीम इंडियाचे कर्णधारपद सोपवले आहे. आयर्लंड दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या 3 टी-20 सामन्यांमध्ये तो टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे.
मार्च महिन्यात बूम-बूमच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्याने एनसीएमध्ये पुनरागमन केले आणि आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. पण, तो बऱ्याच काळानंतर तो क्रिकेट खेळणार आहे, त्यामुळे त्याच्यावर कामाचा ताण वाढेल. पण, बोर्डाने त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारीही दिली आहे, जी त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
कर्णधारपदामुळे खेळाडूवर कामाचा ताण वाढतो, आणि बुमराहवर वाढता कामाचा ताण ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. आशिया कप आणि विश्वचषक जवळ आल्याने, कामाच्या वाढीव भारामुळे बुमराहच्या तंदुरुस्तीवर परिणाम झाला, तर तो या मोठ्या स्पर्धेला मुकू शकतो.
भारत आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या जाणार्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत जसप्रीत बुमराहच्या रूपात वरिष्ठ खेळाडू उपस्थित आहे. याशिवाय रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह जवळपास प्रत्येक खेळाडूला विश्रांती देण्यात आली आहे, ज्यांना आगामी आशिया कप आणि विश्वचषक 2023 च्या संघात भाग घ्यायचा आहे.
जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिळक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई , प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि आवेश खान.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.