IND vs SL Team India Jersey : KILLER टीम! भारतीय संघाच्या जर्सीमध्ये अचानक झालाय मोठा बदल

BCCI New Jersey Sponsor IND vs SL
BCCI New Jersey Sponsor IND vs SLesakal
Updated on

BCCI New Jersey Sponsor IND vs SL : भारतीय संघ उद्या (दि. 3) श्रीलंकेविरूद्ध आपला पहिला टी 20 सामना खेळणार आहे. या सामन्याद्वारे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील युवा संघ आपली टी 20 मोहीम सुरू करणार आहे. दरम्यान, संघातील काही खेळाडूंनी श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठीच्या नव्या जर्सीसह सोशल मीडियावर फोटो शेअर केले.

BCCI New Jersey Sponsor IND vs SL
Team India : ‘ही’ आहेत 2023 वर्ल्डकपसाठी BCCI ने शॉर्टलिस्ट केलेली टीम इंडियातील नावं...

बीसीसीआयचे जर्सी प्रायोजक एमपीएलने अचानकपणे बीसीसीआयसोबतचा आपला करार संपवत राईट्स केवाल किरण क्लोथिंग लिमिटेंड (Brand Killer) कडे हस्तांतरित केले. बीसीसीआयच्या अॅपेक्स काऊन्सिल मिटिंगमध्ये मार्चपर्यंत कोणत्याही प्रायोजकाला आपले राईट्स हस्तांतरित करता येणार नाही असा निर्णय झाला होता. मात्र आता भारतीय संघाच्या जर्सीवर अचानकपणे किलरचा लोगो झळकल्यामुळे एमपीएलने आपला करार त्वरित संपवल्याचे स्पष्ट झाले. (Sports Latest News)

BCCI New Jersey Sponsor IND vs SL
Team India : बीसीसीआयच्या नव्या पॉलिसीने IPL संघाची झालीये चांगलीच अडचण; रोहित, बुमराह, हार्दिक आता...

गेल्या सहा महिन्यात बीसीसीआयने प्रायोजक असलेल्या तीन बड्या कंपन्या गमावल्या आहेत. पेटीयमकडे बीसीसीआयचे स्थानिक क्रिकेट हक्क होते. त्यांनी ते मास्टरकार्डकडे हस्तांतरित करण्यात आले. त्यानंतर बायजूसने देखील बीसीसीआयला करार संपण्यापूर्वीच त्यातून बाहेर पडणार असल्याचे कळवले. आता एमपीएलने ऐनवेळी माघार घेत बीसीसीआयला धक्का दिला.

बीसीसीआय आणि एमपीएल यांच्यातील जर्सी स्पॉन्सरशिपचा करार हा 31 डिसेंबर 2023 पर्यंतचा होता. यापूर्वी एमपीएलने नोव्हेंबर 2020 मध्ये नायकीकडून हे हक्क मिळवले होते. मात्र बाजारातील मंदी पाहता एमपीएलने बीसीसीआयच्या संमती मिळताच करारातून माघार घेतली आहे.

हेही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.