Virat Kohli BCCI : विराट कोहलीवर बीसीसीआय नाराज... अधिकाऱ्यांनी पाठवला फिटनेस कॅम्पमध्ये 'मेसेज'

Virat Kohli BCCI
Virat Kohli BCCIesakal
Updated on

Virat Kohli BCCI : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या बंगळुरूजवळील अलूर येथे फिटनेस कॅम्प करत आहे. भारतीय संघातील अजून काही खेळाडू हे या फिटनेस कॅम्पमध्ये सहभागी झाले आहेत. दरम्यान, बीसीसीआय विराट कोहलीच्या एका कृतीवर चांगलीच नाराज झाली. त्यांनी कॅम्पमध्ये संदेश पाठवून विराट कोहलीला आपल्या नाराजीबद्दल सांगितले.

Virat Kohli BCCI
Ravichandran Ashwin : युवराज, धोनी निवृत्त झाल्यापासून.... अश्विनने भारतीय संघाची दुखरी नस पकडली

त्याचं झालं असं की बीसीसीआयने आशिया कपपूर्वी भारतीय संघातील काही खेळाडूंची फिटनेस टेस्ट घेतली. या फिटनेस टेस्टमध्ये प्रसिद्ध यो - यो टेस्टचा देखील समावेश होता. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या यो - यो टेस्टची माहिती इन्स्टाग्रामवर शेअर केली होती.

विराट कोहली आपला फोट शेअर करत त्याला 'यो - यो टेस्ट 17.2 ने पास केल्याचा आनंद' असे कॅप्शन दिले होते. मात्र यावर बीसीसीआयने आपली नाराजी विराट कोहली पर्यंत पोहचवली.

भारतीय संघातील काही खेळाडूंसाठी अलूर येथे सहा दिवसांचा फिटनेस कॅम्प आयोजित केला आहे. पहिल्या दिवशी खेळाडूंची यो - यो टेस्ट झाली. त्यानंतर विराट कोहलीने याची माहिती इन्स्टाग्राम अकांऊटवर शेअर केली.

Virat Kohli BCCI
Naseem Shah VIDEO : तोच गोलंदाज, तेच शेवटचे षटक, तोच नसीम शाह.... अफगाणिस्तानच्या विजयात पुन्हा आला आडवा

बीसीसीआय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'खेळाडूंना तोंडी कळवण्यात आलं आहे की संघातील गोपनीय माहिती सोशल मीडियावरून शेअर करणे टाळले पाहिजे. ते सरावावेळेचे फोटो शेअर करू शकतात मात्र त्यांनी टेस्टमध्ये किती मार्क पडले हे शेअर करणे हा कराराचा भंग ठरू शकतो.'

भारतीय क्रिकेटपूट हे खूप क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे फिटनेस टेस्टचे अंक हे बदलू शकतात. ज्या खेळाडूंनी 13 दिवसाचा फिटनेस प्रोग्राम पूर्ण केला आहे. आशिया कप 2023 पूर्वी त्यांचे पूर्ण शरिराचे परिक्षण होणार आहेत. यात ब्लड टेस्टचा देखील समावेश आहे. बीसीसीआय वर्ल्डकपच्या तोंडावर कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.