Team India : वर्ल्ड कप पराभवानंतर BCCI एक्शन मोड! 'या' दिग्गज खेळाडूला केलं बाहेर

BCCI ने मोठा निर्णय! टीम इंडियातून अनुभवी खेळाडूला सोडण्याचा घेतला निर्णय
Team India
Team Indiasakal
Updated on

Board of Control for Cricket in India : टी-20 विश्वचषक 2022 मधील पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) अनेक मोठी पावले उचलत आहे. या स्पर्धेत टीम इंडियाला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती आधीच काढून टाकली आहे, तर आता आणखी एक मोठी कारवाई करताना बीसीसीआयने टीम इंडियातील एका अनुभवी खेळाडूला डावलले आहे.

Team India
IND vs NZ 2nd ODI : अशी असेल भारताची Playing 11, उपकर्णधारालाच बेंचवर बसवणार?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टी-20 विश्वचषक 2022 मधील पराभवानंतर मानसिक कंडीशनिंग प्रशिक्षक पॅडी अप्टन यांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय आता दक्षिण आफ्रिकेतील रहिवासी असलेल्या पॅडी अप्टनचा करार पुढे नेणार नाही. 2022 च्या T20 विश्वचषकासह पॅडी अप्टनचा बीसीसीआयसोबतचा करार संपला आहे.

Team India
IND vs NZ : पराभवानंतर टीम इंडियात होणार बदल! कॅप्टन धवन 'या' खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता ?

53 वर्षीय पॅडी अप्टन यांना मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या सल्ल्यानुसार टीम इंडियाचे मानसिक कंडिशनिंग प्रशिक्षक बनवण्यात आले होते. या वर्षी जुलैमध्ये टीम इंडियाशी जोडल्या गेले होते. याआधी पॅडी अप्टन यांनी 2008-11 च्या कार्यकाळात मेंटल कंडिशनिंग कोच आणि स्ट्रॅटेजिक कोच या दुहेरी भूमिकेत टीम इंडियासोबत काम केले आहे.

Team India
Sania Mirza Viral Post: नवीन पोस्टमध्ये सानिया पुन्हा रडली; घटस्फोट सस्पेन्समध्ये!

पॅडी अप्टनने आयपीएलमध्ये राहुल द्रविडसोबत राजस्थान रॉयल्ससाठी काम केले आहे. पॅडी अप्टन यांनी पुणे वॉरियर्स, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्ससह मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे, तसेच बिग बॅश लीगमध्ये पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर आणि सिडनी थंडरचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत परफॉर्मन्स डायरेक्टर म्हणूनही काम केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()