World Cup 2023 Schedule : भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपला अवघे काही महिने राहिले आहेत. मात्र आयसीसीने अजून वर्ल्डकपचे संपूर्ण वेळापत्रकच जाहीर केलेले नाही. आयसीसीकडून अंतिम वेळापत्रक घोषित करण्यासाठी विलंब होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे बीसीसीआ आणि पीसीबी हे यावरून एकमेकांविरूद्ध उभे ठाकले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आपल्या म्हणण्यानुसार वेळापत्रकात बदल हवा आहे. दुसरीकडे बीसीसीआय वेळापत्रक अजून घोषित न झाल्याने निराश आहे.
WTC Final नंतर आयसीसी वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर करेल असे वाटले होते. मात्र आता अठवडा उलटून गेला तरी वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. वेळापत्रक जाहीर करण्यात का उशीर होतोय याबाबत बीसीसीआय अधिकाऱ्याने माहिती दिली.
गेल्या आठवड्यात आयसीसीने वेळापत्रकाचा एक ड्राफ्ट पाठवला होता. यावर बीसीसीआय आणि पीसीबीला त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. भारताचा या ड्राफ्ट बाबत कोणताही आक्षेप नव्हता. मात्र पीसीसीने मॅचअपमध्ये दोन मोठे बदल करण्याची मागणी केली. त्यामुळे वेळापत्रक जाहीर करण्यात उशीर होत आहे.
बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, 'पीसीबी जे हवं ते बोलू शकते. मात्र त्यांच्यामुळेच वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर होण्यास उशीर होत आहे हे सत्य आहे. आधी पाकिस्तान अहमदाबादमध्ये खेळण्यास तयार नव्हता आता ते चेन्नईत देखील खेळण्यास तयार नाहीये. ते कायम असुरक्षित राहतात.'
पीसीबीने सुरक्षेच्या कारणास्तव अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताविरूद्ध खेळण्यास विरोध केला आहे. त्यानंतर भारत आपला पाकिस्तान विरूद्धचा सामना चेन्नईत खेळणार आहे. मात्र डाफ्ट शेड्युल मिळाल्यानंतर पाकिस्तान आता बीसीसीआयकडे विनंती करतोय की त्यांचा अफगाणिस्तान विरूद्धचा सामना चेन्नईतून हलवून दुसऱ्या ठिकाणी खेळवण्यात यावा.
पीसीबीचा दावा आहे की पाकिस्तानचा संघ चेन्नईतील फिरकी खेळपट्टीवर अफगाण संघाचा सामना करू शकणार नाही. पीसीबीने ऑस्ट्रेलियाविरूद्ध बेंगळुरूमध्ये खेळण्यास देखील विरोध केला आहे. पाकिस्तानला अफगाणिस्ताविरूद्धचा सामना बंगळुरूत तर ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना चेन्नईत खेळायचा आहे. बीसीसीआयने ही मागणी धुडकावून लावली आहे. आता आयसीसी याबाबत मध्यस्थी करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.