MS Dhoni Mentor : आयपीएल संघांनी युएई आणि दक्षिण आफ्रिका येथील टी 20 लीगमधील बरेच संघ विकत घेतले आहेत. चेन्नई सुपर किंग्जने दक्षिण आफ्रिकेच्या नव्या टी 20 लीगमध्ये जोहान्सबर्ग सुपर किंग्ज (Johannesburg Super Kings) नावाने संघ खरेदी केला आहे. या संघाकडून पूर्वाश्रमीचा सीएसके स्टार फाफ ड्युप्लेसिस खेळणार आहे. दरम्यान, महेंद्रसिंह धोनी देखील जोहान्सबर्ग किंग्जमध्ये दिसणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार दक्षिण आफ्रिकेतील टी 20 लीगमध्ये मेंटॉरच्या भुमिकेत असले असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता बीसीसीआयने (BCCI) या मुद्यावर सीएसके आणि धोनीला तंबी दिली असल्याचे वृत्त आहे.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार जर धोनीला दक्षिण आफ्रिकेतील लीगमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आधी आयपीएलशी नाते तोडावे लागणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्या नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, कोणताही भारतीय खेळाडू सगळ्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्त झाल्याशिवाय विदेशी लीगमध्ये भाग घेऊ शकत नाही हे स्पष्ट आहे. जर एखाद्या खेळाडूला विदेशी टी 20 लीगमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याला बीसीसीआयशी सर्व संबंध तोडावे लागतील.'
बीसीसीआयचे विदेशी टी 20 लीग खेळण्याबाबत नियम स्पष्ट आहेत. बीसीसीआय भारतीय खेळाडूंना विदेशातील टी 20 लीग खेळण्याची परवानगी देत नाही. जर कोणता भारतीय खेळाडू सीपीएल आणि बीबीएल सारख्या लीग खेळू इच्छित असेल तर त्या खेळाडूला आधी आयपीएल सहीत सर्व क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्त व्हावं लागेल. अनेक खेळाडूंनी हा नियम बदलावा यासाठी आवाज उठवला आहे. आता महेंद्रसिंह धोनी जोहान्सबर्ग किंग्ज मेटॉरच्या रूपात दिसतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.