Roger Binny Daughter In Law Mayanti Langer : भारताच्या 1983 च्या वर्ल्डकप विनिंग संघातील अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी यांनी नुकतेच बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रं आपल्या हातात घेतली. त्यांनी भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीची जागा घेतली. रॉजर बिन्नी यांचे बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरभ गांगुलीसह अनेक माजी क्रिकेटपटूंनी अभिनंदन केले. मात्र या सर्वांमध्ये रॉजर बिन्नी यांची सून आणि क्रीडा निवेदक मयंती लँगरचे ट्विट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
मयंती लँगरने एक ट्विट केले. या ट्विटमध्ये तिने टाईम्स वृत्तपत्राचा फोटो शेअर केला आहे. यात सासरेबुवा रॉजर बिन्नी बीसीसीआय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्याबद्दलची एक बातमी देखील आहे. विशेष म्हणजे मयंती लँगरने या फोटोला कोणतेही कॅप्शन दिलेली नाही. मात्र डोळे दिपवणारी कामगिरी दाखवणारा एक इमोजी शेअर केला.
मयंती लँगर ही आघाडीची क्रीडा निवेदक आहे. याचबरोबर ती भारताचा क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीची पत्नी देखील आहे. मयंतीने बाळंतपण आणि मुलाच्या संगोपनासाठी आपल्या कामातून ब्रेक घेतला होता. मात्र आता ती पुन्हा क्रीडा निवेदक म्हणून कार्यरत झाली आहे. मयंतीचे सोशल मीडियावर बरेच फॅन फॉलोईंग आहे.
अँग्लो इंडियन रॉजर बिन्नी हे बिनविरोध बीसीसीआय अध्यक्ष झाले आहेत. टी 20 वर्ल्डकपच्या आधी त्यांनी आपला पदभार स्विकारला. विशेष म्हणजे बिन्नी हे क्रिकेटर आणि प्रशिक्षक राहिलेले पहिले बीसीसीआय अध्यक्ष आहेत. त्यांनी 1983 च्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 18 विकेट्स घेत भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. बिन्नी यांनी भारताकडून 27 कसोटी आणि 72 वनडे सामने खेळले आहेत. त्यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी देखील भारताकडून खेळला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.