T20 WC : पाकिस्तानच्या भविष्यावर BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले...

टी-20 विश्वचषकात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा एका धावेने पराभव केला मात्र...
bcci president roger binny
bcci president roger binnysakal
Updated on

Roger Binny T20 WC : टी-20 विश्वचषकात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा एका धावेने पराभव केला. मात्र, या स्पर्धेत उलथापालथ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. पाकिस्तानपूर्वी इंग्लंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचे संघही छोट्या संघांविरुद्ध हरले आहेत. बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष स्टुअर्ट बिन्नी यांनीही झिम्बाब्वे आणि आयर्लंडच्या विजयावर आनंद व्यक्त केला. आता पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचा मार्ग अवघड झाला आहे, असे त्याने म्हटले आहे.

bcci president roger binny
Sourav Ganguly : BCCI च्या ऐतिहासिक घोषणेनंतर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया; वाचा कोणाला दिले श्रेय

बिन्नी म्हणाला, छोटे संघ पुढे येत आहेत हे चांगले आहे. झिम्बाब्वे आणि आयर्लंडने या टी-20 विश्वचषकात हे सिद्ध केले आहे. आता तुम्ही छोट्या संघांना हलक्यात घेऊ शकत नाही. ते तुम्हाला सहज पराभूत करू शकतात. मला असे वाटते की पाकिस्तानसाठी आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी कठीण होईल.

bcci president roger binny
Shoaib Akhtar : ...तर भारत पुढच्या आठवड्यात घर गाठणार; अख्तर बरळला!

टी-20 विश्वचषक 2022 मध्ये स्कॉटलंडने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. यानंतर, महत्त्वपूर्ण सामन्यात आयर्लंडकडून पराभव पत्करावा लागला आणि दोन वेळचा चॅम्पियन संघ सुपर-12 फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही. त्याचवेळी श्रीलंकेचा नामिबियाकडून पराभव झाला. मात्र नंतर श्रीलंकेच्या संघाने दोन्ही सामने जिंकून सुपर-12 मध्ये स्थान मिळवले.

वेस्ट इंडिज स्पर्धेतून बाद झाल्यानंतर पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात आयर्लंडने इंग्लंडचा खेळ खराब केला. डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंडने इंग्लंडचा पाच धावांनी पराभव केला. यानंतर झिम्बाब्वेने आश्चर्यकारक कामगिरी करत पाकिस्तानचा एका धावेने पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.