Roger Binny : ICC चं भारताला झुकतं माप! रॉजर बिन्नी म्हणतात, असं काय वेगळं...

BCCI President Roger Binny
BCCI President Roger Binnyesakal
Updated on

BCCI President Roger Binny : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये वादग्रस्त अंपायरिंग आणि निर्णयांची बरीच चर्चा होत आहे. दरम्यान, भारत आणि बांगलादेश सामन्यानंतर आयसीसी भारताला झुकतं देत अशी ओरड काही माजी क्रिकेटपटूंनी सुरू केली आहे. यावर बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चेन्नईमध्ये एएनआयला दिलेल्या मुलाखतीत रॉजर बिन्नी यांनी पाकिस्तानात होऊ घातलेल्या आशिया कप 2023 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत देखील मोठं वक्तव्य केलं.

BCCI President Roger Binny
Virat Kohli birthday: पहिली भेट ते आजवरचा प्रवास;अनुष्का शर्माने दिल्या नवऱ्याला वाढदिवसाच्या विचित्र शुभेच्छा...

रॉजर बिन्नी पाकिस्तानात होणाऱ्या आशिया कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत म्हणाले की, 'भारतीय संघाने पाकिस्तानात जायचं की नाही याबाबतचा निर्णय बीसीसीआयच्या हातात नाही. हा निर्णय घेणे हे सरकारचे काम आहे. ते आम्हाला परवानगी देतात.' दरम्यान, बिन्नी यांना ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये नुकताच झालेल्या भारत - बांगलादेश सामन्यातील वादाबाबत प्रश्न विचारण्यात आला. बांगलादेशचा खेळाडू नरूल हसनने विराट कोहलीवर फेक फिल्डिंगचा आरोप केला होता. याचबरोबर पावसाच्या व्यत्ययानंतर अंपायर्सनी त्वरित सामना सुरू केल्यावरही बरीच चर्चा होत आहे.

याबाबत बोलताना रॉजर बिन्नी म्हणाले की, 'आम्हाला आयसीसी झुकतं माप देते हा आरोप योग्य नाही. प्रत्येकाला समान वागणूक मिळते. तुम्ही जसं म्हणताय तसं काही होत नाहीये. आम्हाला इतर संघापेक्षा असं वेगळं काय मिळतंय? भारत हा क्रिकेटमधील बलाढ्य शक्ती आहे. मात्र आम्हाला सर्वांना एकसमानच वागणूक मिळते.'

BCCI President Roger Binny
Sushil Kumar : खुनाचा आरोप असलेल्या कुस्तीपटू सुशिल कुमारला जामीन

रॉजर बिन्नी यांनी गेल्या महिन्यात देखील भारत पाकिस्तान किंवा इतर देशात जाणार की नाही याबाबतचा निर्णय क्रिकेट बोर्ड घेऊ शकत नाही. तो निर्णय सरकावर अवलंबून असतो असे सांगितले होते. ते म्हणाले होते की, 'हा आमचा निर्णय नसतो. आम्ही आमचा संघ कोठे जाणार कोठे नाही हे आम्ही सांगू शकत नाही. आम्हाला देश सोडण्यापूर्वी सरकारची परवानगी घ्यावी लागते. तसेच इतर देश भारतात येण्यापूर्वी देखील सरकारची परवानगी घ्यावी लागते. आम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही. आम्हाला सरकावर अवलंबून रहावे लागते.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.