BCCI Really Like PAK Journalist Cowardly Tweet : क्रिकेट विश्वात चाहत्यांना नेहमीच भारत आणि पाकिस्तान सामन्यांची प्रतीक्षा असते. मात्र दोन्ही संघांनी गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांविरुद्ध कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. एकमेकांच्या देशांनाही भेट दिली नाही. पण पुढच्या वर्षी भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार का यावरून आता गदारोळ सुरू झाला आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नाही. मग काय या विधानावरून चांगलाच गदारोळ झाला. पीसीबी संतप्त झाले आणि पुढच्याच वर्षी भारताने आयोजित केल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातून माघार घेण्याची धमकी दिली.
पाकिस्तानी पत्रकारांनीही यावर अनेक कमेंट केल्या. यातील एक पत्रकार सय्यद समर अब्बास यांनी जय शाह यांच्या वक्तव्यावर ट्विट करत 'कायर भागो नहीं. खेल को राजनीति से अलग रखें. असे म्हटले आहे. यात मोठी गोष्ट म्हणजे बीसीसीआयनेही हे ट्विट लाईक केले आहे. असा दावाही समर अब्बास यांनी केला आहे. समर अब्बासनेही त्याचे ट्विट बीसीसीआयला टॅग केले. हे ट्विट बीसीसीआयलाही आवडले असल्याचा दावा समरने केला आहे. त्याचा स्क्रीनशॉटही समरने स्वत: शेअर केला आणि बीसीसीआयचे आभारही मानले. त्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे.
16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सध्या पात्रता सामने खेळले जात आहेत. टीम इंडियाचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी हा सामना खेळवला जाणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.