Team India: बीसीसीआयचा 7 खेळाडूंना अचानक मोठा दणका! कारकिर्दीवर दाटले संकटाचे ढग

bcci released the annual-contract-list- team india these-7-players-are-not-included-
bcci released the annual-contract-list- team india these-7-players-are-not-included-
Updated on

BCCI Contract List : टीम इंडियाच्या खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे बीसीसीआय दरवर्षी वार्षिक कराराची यादी जाहीर करते. बोर्डाने 26 मार्चला 2022-23 या वर्षासाठी वार्षिक कराराची यादी प्रसिद्ध केली. या यादीत अनेक बदल अपेक्षित होते आणि तेच झाले.

टीम इंडियाचे अनेक खेळाडू चांदी झाली तर अनेक खेळाडूंना निराश व्हावे लागले. बीसीसीआयने या यादीतून 7 खेळाडूंना वगळले असून त्यानंतर आता त्यांच्या कारकिर्दीवर संकटाचे ढग निर्माण झाले आहेत.

bcci released the annual-contract-list- team india these-7-players-are-not-included-
KKR IPL 2023: कोलकाता नाईट रायडर्सची मोठी घोषणा! दुखापती अय्यरच्या जागी हा दिग्गज खेळाडू होणार कर्णधार

बीसीसीआयने यंदाच्या वार्षिक कराराची यादी जाहीर करताच. या यादीतून 7 भारतीय खेळाडू बाहेर होते. यामध्ये अनेक अनुभवी खेळाडू आहेत तर युवा खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे. टीम इंडियाचा फलंदाज अजिंक्य रहाणे, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा, फलंदाज हनुमा विहारी, सलामीवीर मयंक अग्रवाल आणि अष्टपैलू दीपक चहर यांचा समावेश नाही. बीसीसीआयने या खेळाडूंना यंदाच्या करार यादीतून वगळले आहे.

bcci released the annual-contract-list- team india these-7-players-are-not-included-
Team India : भारतीय निवड समितीने घेतला मोठा निर्णय! वयाच्या ३२व्या वर्षीच 'या' खेळाडूचं करिअर उद्ध्वस्त

बोर्डाने सात खेळाडूंना यादीतून काढून टाकल्याने आता त्यांच्या कारकिर्दीवर प्रश्न निर्माण झाले आहेत. या खेळाडूंनी बराच काळ संघासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अशा परिस्थितीत आता या खेळाडूंची कारकीर्द धोक्यात आली आहे.

इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि हनुमा विहारी दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. मात्र या खेळाडूंनी दीर्घकाळ संघासाठी एकही सामना खेळलेला नाही, तर साहाने आधीच सांगितले आहे की संघात संधी मिळणे खूप कठीण आहे. रहाणेलाही जानेवारी 2022 पासून संघात संधी देण्यात आलेली नाही.

bcci released the annual-contract-list- team india these-7-players-are-not-included-
Team India: आधी संघातून हकालपट्टी… आता BCCIच्या करारातून बाहेर! तीन दिग्गज खेळाडूंची कारकीर्द संपली?

टीम इंडियामध्ये स्थान न मिळाल्याने मयंक अग्रवालने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या. मयंकने धमाकेदार कामगिरी करताना धावांचे तुफान आणले होते. त्याने 900 हून अधिक धावा केल्या होत्या आणि द्विशतकही केले होते. त्याची कामगिरी पाहता त्याला संघात परत आणले जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.