नवीन वर्ष सुरू होताच भारतीय क्रिकेट संघ पुढील आव्हानांसाठी सज्ज झाला आहे. 2022 मध्ये टीम इंडियाने पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी गमावली, त्यासोबतच इतर काही अडचणींचा सामना क्रिकटे बोर्ड आणि संघाला करावा लागला. या सगळ्यामध्ये बीसीसीआयमध्ये वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे रविवारी एक महत्त्वाची बैठक झाली, ज्यामध्ये टीम इंडियाची कामगिरी, रोडमॅप आणि इतर समस्यांवर चर्चा करण्यात आली.
मुंबईतील बीसीसीआय कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह, कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड, एनसीए संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण आणि मुख्य चीफ सलेक्टर शर्मा उपस्थित होते.
या बैठकीत टीम इंडियाची 2022 मधील कामगिरी, 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमधील पराभवावर चर्चा झाली. यासोबतच वर्कलोड मॅनेजमेंट, फिटनेस पॅरामीटर्स आणि एकदिवसीय विश्वचषक 2023 साठीचा रोडमॅपही तयार करण्यात आला आहे.
बैठकीत या तीन विषयांवर शिक्कामोर्तब
• उदयोन्मुख खेळाडूंना आता देशांतर्गत मालिकांमध्ये सतत्याने खेळावे लागेल, जेणेकरून ते राष्ट्रीय संघाच्या निवडीसाठी तयारी करू शकतील.
• यो-यो चाचणी आणि डेक्सा निवड प्रक्रियेचा भाग असतील, ज्या वरिष्ठ संघाच्या पूलमध्ये असलेल्या खेळाडूंवर लागू केले जातील.
• वनडे वर्ल्डकप 2023 आणि इतर सीरीज पाहता, NCA सर्व IPL फ्रँचायझींशी बोलेल आणि खेळाडूंच्या वर्कलोड व्यवस्थापनावर चर्चा करेल.
या बैठकीची प्रतीक्षा खूप दिवसांपासून केली जात होती. कारण T20 विश्वचषक 2022 मधील पराभवानंतर टीम इंडियामध्ये बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. हार्दिक पांड्याकडे टी-20 संघाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर रोहित शर्माकडे वनडे आणि कसोटीची कमान सोपवण्यात आली आहे.
याशिवाय टी-20 साठी वेगळा प्रशिक्षक आणि सपोर्टिंग स्टाफही आणला जाऊ शकतो. मात्र, बीसीसीआयने याबाबत अधिकृतपणे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका टी-20 मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर एकदिवसीय मालिकेत वरिष्ठ खेळाडू उपलब्ध असतील. अशा परिस्थितीत जेव्हा यानंतर नवीन निवड समिती स्थापन होईल, तेव्हा टी-20 च्या कर्णधारपदावर निर्णय घेतला जाऊ शकतो.
टीम इंडियाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर 2022 साली आशिया कप आणि T20 वर्ल्डकपमध्ये पराभव पत्करावा लागला होता, तर परदेशी भूमीवर कसोटी सामने हरले होते. आता 2023 मध्येही टीम इंडियाला आशिया कप खेळायचा आहे आणि 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषकही होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.