IPL 2022 Player Mega Auction Rules : व्हॅलेंटाइन डेच्या आधी आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. 12 आणि 13 फेब्रुवारीला दहा फ्रेंचायझी संघ आपल्या पसंतीच्या खेळाडूवर पैशांची बरसात करताना पाहायला मिळले. मैदानातील रणनितीपूर्वी लिलावाच्या टेबलवर रंगणाऱ्या खेळासाठी बीसीसीआयने खास नियमावली तयार केली आहे. बंगळुरुमध्ये होणाऱ्या मेगा लिलावासाठी फ्रेंचायझींना हे नियम पाळावे लागणार आहेत. (BCCI Share IPL 2022 Player Mega Auction Rules with franchise)
प्रत्येक फ्रेंचायझी (Franchise) संघातील 10 जणांना मेगा लिलावासाठी (IPL 2022 Player Mega Auction) एन्ट्री देण्यात येणार आहे. 4 फेब्रुवारीपर्यंत फ्रेंचायझी संघाना प्रतिनिधीत्व करणाऱ्यांची नावे द्यायची आहेत. मेगा लिलावावेळी टेबलवर जास्तीत जास्त 8 जणांना एकत्र बसता येईल.
मेगा लिलावासाठी (IPL 2022 Player Mega Auction) फ्रेंचायझी संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्तीला 72 तासांपूर्वी कोरोनाच्या चाचणीचे दोन रिपोर्ट बीसीसीआयच्या मेडीकल टीमसमोर (BCCI Medical Team) सादर करावे लागतील. ही चाचणी 9 आणि 10 फेब्रुवारीला सकाळी 8 ते 10 सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कोरोना टेस्ट घेण्यात येईल.
परेशातून येऊन लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्तीसाठीही कठोर नियम करण्यात आले आहेत. त्याला 7 दिवस क्वारंटाईनच्या नियमावलीचे पालन करावे लागतील. क्वारंटाईननंतर आठव्या आणि नवव्या दिवशी कोरोना चाचणी घेण्यात येईल. (COVID RTPCR test) दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह असतील तर त्याला मेगा लिलावात सहभागी होण्याची परवानगी मिळेल.
जी मंडळी आयपीएलच्या मेगा लिलावामध्ये सहभागी होणार आहे त्यांना 11 फेब्रुवारी दुपारी 12 वाजण्यापूर्वी नियोजित हॉटेलमध्ये पोहचावे लागेल. जोपर्यंत कोरोना चाचणीचा अहवाल समोर येत नाही तोपर्यंत त्यांना हॉटेल रुममधून बाहेर पडता येणार नाही.
मेगा लिलावापूर्वी 12 आणि 13 फेब्रुवारीला रात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत पुन्हा एकदा सहभागी लोकांची कोरोना चाचणी घेण्यात येईल. रिपोर्ट आल्यानंतरच संबंधित व्यक्ती लिलावात सहभागी होणार की नाही हे पक्के होईल.
आयपीएल मेगा लिलावादरम्यान प्रत्येकाने N95 मास्कचा वापर (preferably N95) करणं अनिवार्य करण्यात आले आहे.
मेगा लिलावामध्ये फ्रेंचायझीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्याला कोविड व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट, कोणत्या प्रकारचे व्हॅक्सिन घेतले, बूस्टर डोस घेतला का? कोरोनाची लागण झाली होती का? यासंदर्भातील माहिती बीसीसीआय मेडिकल टीमसोबत शेअर करावी लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.