India tour of South Africa : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा जवळ आला असून त्यासाठी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील आज एक, दोन नाही तर चार संघांची घोषणा होऊ शकते. भारतीय संघाची आज टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी निवड होणार आहे. यासोबत भारत अ संघाचीही निवड होऊ शकते.
10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दौऱ्यात टीम इंडियाला 3 टी-20 आंतरराष्ट्रीय, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
भारत अ संघही दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी जाऊ शकतो. वृत्तानुसार, भारतीय संघ व्यवस्थापनाची संपूर्ण नजर कसोटी मालिकेसाठी मजबूत संघ निवडण्यावर आहे. जे प्रामुख्याने कसोटी मालिकेच्या तयारीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. या संघात अशा खेळाडूंची निवड होण्याची शक्यता जास्त आहे, जे कसोटी मालिका खेळणार आहेत. याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे भारताने क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये दक्षिण आफ्रिकेत एकही मालिका जिंकलेली नाही. आणि दुसरे म्हणजे, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकसाठी ही मालिका महत्वाची आहे.
भारत अ संघात अजिंक्य रहाणे, अभिमन्यू ईश्वरन या खेळाडूंच्या निवडीची चर्चा आहे. कसोटी मालिकेच्या तयारीसाठी हा सराव सामन्यासारखा असल्याने कसोटी संघातील काही निवडक नावेही यात खेळताना दिसतात. रिपोर्टनुसार, बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी 45 भारतीय खेळाडूंसाठी व्हिसा तयार केला आहे.
वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ निवडीबाबत अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय निवड समितीची बैठक 30 नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी नवी दिल्लीत होऊ शकते. मुख्य प्रशिक्षकाच्या नावाला मंजुरी मिळाल्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघनिवडीत रोहित शर्माबाबतचा सस्पेंसही दूर होणार आहे.
रोहित टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत खेळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. किंवा विराट कोहलीप्रमाणे तोही बीसीसीआयला सांगून पांढऱ्या चेंडूच्या मालिकेतून ब्रेक घेईल. अशीही बातमी येत आहे की, बीसीसीआयला रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेत टी-20 मालिका खेळायची आहे. यासाठी ते रोहितला समजवण्याचाही प्रयत्न करत आहे. मात्र, हे सगळे संघ निवडीनंतरच कळणार आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीय आणि एकदिवसीय मालिकेत कोणत्या खेळाडूंना संधी मिळते हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या टी-20 मालिकेत ते खेळाडू आपले स्थान निर्माण करू शकतील का? अशा खेळाडूंमध्ये ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल अशी नावे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.