Team India : BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये! वर्ल्ड कपमधील पराभवानंतर रोहित सोडणार कर्णधारपद?

हाता-तोंडाशी आलेला घास ऑस्ट्रेलियाने हिसकावून घेतला अन्...
Rohit Sharma and his white-ball plans
Rohit Sharma and his white-ball plans
Updated on

भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा आयसीसीचा वर्ल्ड कप जिंकू शकला नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2023 चा एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकण्याच्या अगदी जवळ आला होता, पण हाता-तोंडाशी आलेला घास ऑस्ट्रेलियाने हिसकावून घेतला. या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा लवकरच बीसीसीआयसोबत बैठक घेणार आहे. या बैठकीत अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.

Rohit Sharma and his white-ball plans
IPL 2024 : गौतम गंभीरने लखनऊ संघाची सोडली साथ! नव्या सीझनमध्ये 'या' संघाचा धरला हात

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI पुढील 4 वर्षांचे नियोजन करण्याच्या तयारीत आहे. ज्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकरला भेटीसाठी बोलावले आहे. रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांच्याशी बोलल्यानंतरच भारतीय संघाच्या पांढऱ्या चेंडू क्रिकेटच्या भविष्याबाबत पुढील रणनीती तयार केली जाईल.

पुढील वर्षी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रोहित शर्माने बीसीसीआयला आधीच स्पष्ट केले आहे की, टी-20 मध्ये त्याच्या जागी दुसऱ्याला कर्णधार बनवल्यास त्याला कोणतीही अडचण नाही. अशा परिस्थितीत रोहित शर्मा पुढील टी-२० विश्वचषकात संघाचा भाग असेल की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

पुढील वनडे वर्ल्ड कप 2027 ला दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. रोहित शर्मा त्यावेळी अंदाजे 40 वर्षांचा असेल. पुढील एकदिवसीय वर्ल्ड कपपूर्वी, 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित केली जाणार आहे जी पाकिस्तानमध्ये होणार आहे. भारताला पुढील 1 वर्षात फक्त 6 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या भवितव्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

भारतीय संघाला पुढील महिन्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही आयोजित केली जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट ही उत्तम संधी असू शकते. बोर्ड आणि निवडकर्ते आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कपनंतर वनडेसाठी नवीन योजना तयार करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.