BCCI Twitter Blue Tick : बीसीसीआयने आज (दि. 13) केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा या कॅम्पेनला पाठिंबा देण्यासाठी ट्विटवरील आपले प्रोफाईल पिक्चर बदलले. बीसीसीआयने भारताचा तिरंगा प्रोफाईल पिक्चर म्हणून लावला. मात्र त्यानंतर बीसीसीआयने ट्विटवरील (X) आपली ब्लू टिक गमावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाच्या नागरिकांना त्यांच्या घरावर तिरंगा फडकावण्याचा आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आपल्या प्रोफाईल पिक्चरवर तिरंगा लावण्यास सांगितले होते. बीसीसीआयने पंतप्रधानांच्या या विनंतीला मान देत आपले प्रोफाईल पिक्चर बदलले.
प्रोफाईल पिक्चर बदलल्यानंतर ट्विटरने त्या अकांऊटची ब्लू टिक हटवली आहे. ब्लू टिक ही ते अकाऊंट अधिकृत असल्याचे प्रमाण देते.
दरम्यान, भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीजविरूद्धचा आपला पाचवा आणि निर्णायक टी 20 सामना खेळत आहे. मालिका सध्या 2 - 2 अशी बरोबरीत आहे. भारतीय संघाने विंडीज दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांची मालिका आणि तीन वनडे सामन्यांची मालिका देखील खेळली आहे. दोन्ही मालिका भारताने जिंकल्या असून आता टी 20 मालिका देखील खिशात घालण्यासाठी आपला जोर लावत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.