Punjab Vs BCCI : पंजाबसोबत राजकारण झालं! कोहलीच्या 100 व्या सामन्याचा उल्लेख करत BCCI उपाध्यक्ष म्हणाले...

Punjab Vs BCCI World Cup 2023 Venue
Punjab Vs BCCI World Cup 2023 Venueesakal
Updated on

Punjab Vs BCCI World Cup 2023 Venue : पंजाबचे क्रीडा मंत्री गुरमीत सिंग यांनी बीसीसीआयने वनडे वर्ल्डकपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केल्यानंतर टीका केली. त्यांनी मोहालीला वर्ल्डकपमधील एकही सामना न देण्यामागे राजकारण असल्याचा आरोप केला. आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पंजाबच्या क्रीडामंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Punjab Vs BCCI World Cup 2023 Venue
World Cup 2023: मोदींच्या अहमदाबादमधील हॉटेल रूमच्या किंमती भिडल्या गगनाला! जाणुन घ्या एका रात्रीचे भाडे

राजीव शुक्ला यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'वर्ल्डकपसाठी पहिल्यांदाच 12 ठिकाणांची निवड केली आहे. यापूर्वी यातील अनेक ठिकाणं ही गेल्या वर्ल्डकपसाठी निवडण्यात आलेली नव्हती. या 12 ठिकाणांव्यतिरिक्त सराव सामने हे त्रिवेंद्रम आणि गुवाहाटी येथे होणार आहेत.'

शुक्ला पुढे म्हणाले की, 'आम्ही दक्षिण विभागातून चार, मध्य विभागातून एक, पश्चिम विभागातून दोन तर उत्तर विभागातून दिल्ली आणि धरमशाळा दोन ठिकाणांची निवड केली आहे.'

Punjab Vs BCCI World Cup 2023 Venue
India Vs Pakistan ICC : पलटी मारली तर... आयसीसीने पाकिस्तानला दिला सज्जड दम

पंजाबच्या क्रीडामंत्र्यांच्या आरोपाबाबत राजीव शुक्ला म्हणाले की, मोहालीला द्विपक्षीय मालिकेतील सामने देण्यात आले आहेत. त्यामुळे पंजाबशी भेदभाव केला जातोय असं काही नाहीये.

ते म्हणाले की, 'गेल्या वर्षी विराट कोहलीची 100 वी कसोटी ही मोहालीत खेळवण्यात आले होते. मोहालीतील मुल्लानपूर स्टेडियम हे तयार होत आहे. जर ते पूर्ण झालं असतं तर त्यांना वर्ल्डकपचा सामना मिळाला असता. सध्याचे मोहालीतील स्टेडियम हे आयसीसीच्या मापदंडात बसत नाही. त्यामुळे सध्याच्या मोहाली स्टेडियमला वर्ल्डकप सामना देण्यात आलेला नाही.'

'मात्र मोहालीला कोणताच सामना दिला नाही असं नाही. रोटेशन पद्धतीने द्विपक्षीय मालिकेतील सामने मोहालीला देण्यात आले आहेत. वर्ल्डकपची ठिकाणे ठरवताना आयसीसीला देखील विचार घ्यावं लागतं. त्रिवेंद्रमला पहिल्यांदाच सराव सामने देण्यात आले आहेत. कोणत्याही झोनकडे दुर्लक्ष केलं आहे असं नाही.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.