Team India Ravindra Jadeja : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हरल्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतली आहे. आता टीम इंडिया महिनाभर कोणतीही मालिका खेळणार नाही. संघातील सर्व खेळाडू सध्या विश्रांती घेत आहेत. पुढील असाइनमेंट वेस्ट इंडिजचा दौरा आहे, जिथे टीम इंडियाला 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने खेळायचे आहेत.
अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाला टी-20 संघातून वगळले जाऊ शकते. त्याच्या जागी संघात त्याच्यासारखी गोलंदाजी आणि फलंदाजी करणाऱ्या अक्षर पटेलला संघात संधी दिल्या जाऊ शकते. रवींद्र जडेजा बऱ्याच दिवसांपासून टी-20 मध्ये टीम इंडियाचा भाग नाही.
रवींद्र जडेजाने आशिया कप 2022 मध्ये शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. आशिया कप स्पर्धेच्या मध्यभागी तो जखमी झाला होता. त्यामुळे त्याला पुन्हा संपूर्ण आशिया कपला मुकावे लागले. दुखापतीमुळे तो 2022 च्या टी-20 विश्वचषकालाही मुकला होता. त्याच्या जागी अक्षर पटेलला टीम इंडियात स्थान देण्यात आले होते.
अक्षर पटेलही बऱ्याच काळापासून टीम इंडियाचा भाग आहे पण रवींद्र जडेजामुळे त्याला संघात संधी दिली जात नाहीये. अक्षर पटेलने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्या 3 सामन्यात त्याने 27 विकेट घेतल्या. रवींद्र जडेजा दुखापतीमुळे संघाबाहेर असल्यामुळे अक्षर त्या मालिकेत खेळला होता.
वयाचा विचार केला तर रवींद्र जडेजा 35 वर्षांचा आहे, तर अक्षर पटेल सध्या 29 वर्षांचा आहे. टी-20 मध्ये तरुणांना संधी देण्याची रणनीती अवलंबत BCCI टी-20 मध्ये रवींद्र जडेजापेक्षा अक्षर पटेलला प्राधान्य देऊ शकते.
रोहित-विराट देखील टी-20 संघाचा नाही भाग
कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी विराट कोहली देखील टीम इंडियाच्या टी-20 सेटअपमधून बराच काळ बाहेर आहेत. 2022च्या विश्वचषकापासून दोघांनीही भारताकडून टी-20 सामने खेळलेले नाहीत. 2022 च्या विश्वचषकातील कामगिरी पाहिल्यानंतर बीसीसीआयने आता टी-20 साठी नवीन संघ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये वरिष्ठ खेळाडूंना स्थान नसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.