Ravichandran Ashwin IND vs ZIM : मंकडिंग करण्यात तरबेज असलेला अश्विन स्वतःवर वेळ आली तर मात्र...

Ravichandran Ashwin India Vs Zimbabwe
Ravichandran Ashwin India Vs Zimbabwe esakal
Updated on

India Vs Zimbabwe : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यापूर्वी भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन पत्रकार परिषदेला सामोरा गेला. यावेळी त्याने भारताची तयारी, ऑस्ट्रेलियातील अनुभव आणि संघावर होणारी टीका यावर उत्तरे दिली. याचबरोबर त्याला मंकडिंग अर्थात नॉन स्ट्राईक रन आऊटबद्दल देखील प्रश्न विचारला. त्यावेळी त्याने स्पष्टपणे उत्तर दिले.

रविचंद्रन अश्विनने भारत - झिम्बाब्वे सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर आपले मत मांडले. यावेळी त्याने मंकडिंगबाबतही प्रश्नांची सडेतोड उत्तरे दिले. तो म्हणाला, 'खरं सांगू का मला मंकडिंग व्हायला आवडणार नाही. मला नॉन स्ट्राईकर एन्डला बाद व्हायला आजीबात आवडणार नाही. मात्र फलंदाज बाद करण्याची ही एक पद्धत आहे.'

Ravichandran Ashwin India Vs Zimbabwe
Khel Ratna : 'खेलरत्न'साठी अचंता शरथ कमलची शिफारस; 'अर्जुन' पुरस्कारासाठी एकाही क्रिकेटपटूचे नाही नाव

रिकी पॉटिंगने भारतीय संघाने आतापर्यंत टी 20 वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली नसल्याची टीका केली होती. या पत्रकार परिषदेत याबाबत त्याला विचारणा झाल्यानंतर त्याने रिकी पॉटिंगला देखील सडेतोड उत्तर दिले. तो म्हणाला, 'आम्ही काही अटीतटीचे सामने खेळले. बांगलादेश आणि पाकिस्तानविरूद्धचे सामने फसले होते. मात्र मला असे वाटते की टी 20 क्रिकेटमध्ये आपण गृहीत धरतो तसं घडेलच असे नाही. मला असे वाटते की त्यात बदलही होतो. जे लोक बाहेरून सामना पाहत आहेत. ते देखील खेळाबद्दल अजून शिकतच आहेत असं मी म्हणेन कारण सामना खूप कमी वेळेत फिरतो आहे. मा काही माजी क्रिकेटपटूंशी आणि तज्ज्ञांशी देखील बोललो. ते देखील म्हणाले की आम्ही देखील खेळाचा वेग आणि होणारा वेगवान विकास याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.'

अश्विन पुढे म्हणाला की, 'संघ चांगली कामगिरी करत नाहीये किंवा त्या दिवशी चांगली कामगिरी केली नाही असे म्हणणे योग्य नाही. मी म्हणाल्याप्रमाणे हा त्या दिवसाचा विषय आहे. तुम्ही तुमच्याविरूद्ध आखलेल्या रणनितीला कशा प्रकारे हाताळता हे महत्वाचे आहे. तुम्ही चांगली गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाविरूद्ध कशा प्रकारे प्रतिआक्रमण करता हे सर्वात महत्वाचे आहे.'

Ravichandran Ashwin India Vs Zimbabwe
Team India T20 WC : डीके, अश्विनसह खुद्द रोहित शर्माचा फॉर्म डोकेदुखी मात्र...

रिकी पॉटिंग याबाबत म्हणाला होता की, 'भारताने अजून त्याचा सर्वोत्तम खेळ केलेला नाही. विराट कोहलीने एक दोन सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. तो आता टी 20 वर्ल्डकप इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. मला असे वाटते की भारताला विजय मिळवण्यासाठी आणि स्पर्धेत पुढची फेरी गाठण्यासाठी विराटने दमदार खेळी करणे गरजेचे आहे. ते विराट कोहलीवर अवलंबून आहेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.