Rohit Sharma In Gym: पाकिस्तानला त्याच्याच भूमीवर कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत केल्यानंतर बांगलादेश क्रिकेट संघ भारतात येणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून 2 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. कर्णधार रोहित शर्मा या मालिकेच्या तयारीत कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. याच्या तयारीसाठी त्याने क्रिकेटचे मैदान नाही तर जिमची निवड केली आहे. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणारा अनुभवी कर्णधार रोहित शर्माचा जिममध्ये घाम गाळणारा व्हिडिओ समोर आला आहे.