चीनच्या बीजिंगमध्ये सध्या विंटर ऑलिम्पिक स्पर्धा सुर आहे. या स्पर्धेत मैदान मारणारे काही खेळाडू जगाला प्रेरणादायी संदेशही देताना दिसते. जिद्द आणि चिकाटी याच्या जोरावर कोणतीही गोष्ट सत्यात उतरवता येते, हेच Max Parrot या खेळाडूंन दाखवून दिलं आहे. कॅनडाच्या या खेळाडूनं स्नोबोर्डर क्रीडा प्रकारात सुवर्ण कामगिरी केली. कॅन्सरवर मात करुन तो स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यामुळे त्याचे गोल्ड हे सर्वांसाठीच एक प्रेरणादायी कहाणीच आहे. अथक परिश्रमाच्या जोरावर कठीण संघर्षानंतरही विजय मिळवता येतो याची झलक त्याने दाखवून दिली.
कॅनाडाच्या (Canada) स्नोबोर्डर मॅक्स पॅरट (Max Parrot )याने कॅन्सरवर मात केली. या आजारातून उठल्यावर त्याने ऑलिम्पिकच्या (Beijing Winter Olympics) तयारीला सुरुवात केली. गोल्डन कामगिरीनंतर तो सध्या चर्चेत आला आसून त्याची फॅन फॉलोअर्स वाढताना दिसत आहे. त्याच्यासोबतच त्याची गर्लफ्रेंडही चर्चेत आली आहे. डिसेंबर 2019 मध्ये त्याला Hodgkin lymphoma हा आजार झाल्याचे निदान झाले. त्यानंतर 12 महिने केमो थेरपीनंतर त्याने कॅन्सरवर मात केली.
27 वर्षीय मॅक्स पॅरट याने बीजिंग विंटर ऑलिम्पिक स्पर्धेत 17 वर्षीय चीनी खेळाडू सू यीमिंग, कॅनाडाचा मार्क मॅक्मोरिस यांना मागे टाकत गोल्ड जिंकले. याआधीच्या स्पर्धेत त्याने रौप्य पदक पटकावले होते. मागील ऑलिम्पिक स्पर्धेनंतर खूप काही बदलले. मला कॅन्सरचा सामना करावा लागला. त्यातून उठून गोल्डन कामगिरी केल्याचा आनं आहे, अशी प्रतिक्रिया त्याने गोल्ड जिंकल्यानंतर दिली.
या वर्षाच्या सुरुवातीलाच मॅक्सन त्याची गर्लफ्रेंड कायला Kayla हिला प्रपोज केलं होते. Kayla Thibault एक व्यावसायिक आहे. मागील एका वर्षांपासून ते दोघे डेट करत होते. सोशल मीडिया या दोघांचे फोटो व्हायरल होत आहेत. विंटर ऑलिम्पिक स्पर्धेत स्वीडनने 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदके आहेत. नँदरलंड 4 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकासह दुसऱ्या तर यजमान चीन 3 सुवर्ण, 2 रौप्यसह 5 पदकांची कमाई केली आहे. केवळ एक भारतीय या स्पर्धेत सहभागी झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.