Ben Stokes Inhaler : इंग्रजांचा श्वास कोंडला; स्टोकसह अनेकांना आता इनहेलरचाच सहारा

Ben Stokes
Ben Stokes esakal
Updated on

Ben Stokes Inhaler : इंग्लंडचा संघ भारतात सुरू असलेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये आता आपल्या आत्मसन्मानासाठी खेळणार आहे. मात्र आधीच वर्ल्डकपमधून बाहेर पडण्यची नामुश्की ओढवलेल्या गतविजेत्यांवर आता दिल्लीतील खराब हवामानाचा फटका त्यांना बसला आहे. एका ब्रिटीश वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंड संघातील खेळाडूंना सरावादरम्यान इनहेलर वापरण्याची वेळ आली आहे.

Ben Stokes
World Cup 2023 Semi Final : भारताने सेमी फायनल गाठताच हॉटेल रूमचे एका रात्रीचे भाडे पोहचले 25,000 पार

बंगळुरू येथे श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यापूर्वी बेन स्टोक्स सरावदरम्यान इनहेलर वापरताना दिसला होता. दिल्लीतील गुरूवारची हवेची गुणवत्ता ही 400 इतकी होती. हा आकडा गंभीर श्रेणीत मोडतो. इंग्लंडचा खेळाडू जो रूट प्रदुषणाबाबत म्हणाला होता की, 'असं वाटत होतं की तुम्हाला श्वास घेता येत नाहीये. हा एक वेगळाच अनुभव होता.

दिल्लीबरोबरच मुंबईत देखील प्रदुषणाचा स्तर वाढला होता. रोहित शर्माने देखील मुंबईविरूद्धच्या सामन्यापूर्वी या मुद्द्यावर चर्चा केली होती. तो म्हणाला होता की, 'एका आदर्श जगात तुम्हाला अशा प्रकारची स्थिती नकोशी वाटते. मला आशा आहे की संबंधित लोकं याच्यावर नक्कीच पावलं उचलतील. ही योग्य स्थिती नाही हे सर्वांना माहिती आहे. तुमची मुलं माझी मुलं आपली भविष्यातील पिढीला कोणत्याही भीतीशिवाय जगण्याची संधी मिळावी हे महत्वाचं आहे.'

Ben Stokes
Ind vs Sl : किंग कोहली शतकापासून का हुकतोय ? तेंडुलकरशी आहे थेट कनेक्शन, दिग्गज क्रिकेटरने सांगितलं सिक्रेट

इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध आपला पुढचा सामना हा अहमदाबादमध्ये खेळणार आहे. यापूर्वी 2017 मध्ये देखील श्रीलंकेच्या खेळाडूंनी कसोटी मालिकेतील नवी दिल्लीतील तिसऱ्या सामन्यादरम्यान मास्क घालून मैदानावर उतरावे लागले होते. लँसेटच्या अभ्यासात समोर आले आहे की 2019 मध्ये भारतात प्रदुषणामुळे जवळपास 23 लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतातील काही शहरांतील हवचा स्तर खूपच खालावला आहे. यादरम्यान आता वर्ल्डकपचा दिल्लीत कोणताही सामना नाही ही एक दिलासा देणारी बाब आहे. सेमी फायनल राऊंडचे सामने हे मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत. तर फायनल अहमदाबादमध्ये होणार आहे. येथील हवेचा स्तर दिल्लीपेक्षा बरा आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.