लीड्स : इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने न्यूझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठा पराक्रम केला. तो कसोटी इतिहासातील 100 षटकार मारणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. हेडिंग्ले येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात त्याने टीम साऊदीला षटकार मारून आपले कसोटीतील षटकारांचे शतक पूर्ण केले. (Ben Stokes Became Only 3rd Batsmen Who Hit 100 Sixes In Test Cricket)
151 कसोटी डाव खेळणारा बेन स्टोक्स आता सध्याचा इंग्लंडचा प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम आणि अॅडम गिलख्रिस्ट यांच्या पंक्तीत जावून बसला आहे. या यादीत मॅक्युलम 107 षटकार मारत अव्वल स्थानावर आहे. तर 96 कसोटी सामन्यात 100 षटकार मारणारा गिलख्रिस्ट दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर आता बेन स्टोक्सचा नंबर लागतो. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत ख्रिस गेल (98) चौथ्या तर जॅक कॅलिस (97) पाचव्या स्थानावर आहेत.
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डॅरेल मिचेल आणि विकेटकिपर टॉम ब्लंडेल यांनी देखील एक विक्रम केला. या दोघांनी एका कसोटी मालिकेत भागीदारीत सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम केला. त्यांनी आतापर्यंत 611 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडच्या मार्टिक क्रोव्ह आणि अँड्र्यू जॉनेस यांनी 1991 मध्ये श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत भागीदारीत 552 धावा केल्या होत्या. हा विक्रम मिचेल आणि ब्लंडेल यांनी मोडला.
तिसऱ्या सामन्यत देखील न्यूझीलंड 5 बाद 123 अशा बिकट स्थितीत असताना मिचेल आणि ब्लंडेल यांनी 120 धावांची दमदार भागीदारी रचली. मात्र ही भागीदारी मॅटी पॉट्सने ब्लंडेलला 55 धावांवर बाद करत संपुष्टात आणली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.