Ben Stokes : 'आम्ही काही कार नाही इंधन भरलं अन्...' स्टोक्स कडाडलाच

Ben Stokes Statement After Retirement Says We Are Not Cars
Ben Stokes Statement After Retirement Says We Are Not Cars ESAKAL
Updated on

डरहम : इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) अचानक वनडे क्रिकेट मधून निवृत्ती (Retirement) घेतली. त्याच्या सारख्या तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये (Three Cricket Format) दर्जेदार अष्टपैलू खेळाडूने अशी अचानक वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने क्रिकेट प्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला होता. स्टोक्सने आपण सततच्या क्रिकेटला कंटाळलो असल्याने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

Ben Stokes Statement After Retirement Says We Are Not Cars
World Chess Day 2022 : भारतातील गुप्त राजवट अन् बुद्धीबळ इतिहास

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत बेन स्टोक्स म्हणाला की, 'आम्ही काही गाड्या नाही. तुम्ही इंधन भरलं आणि खेळण्यास सज्ज झालोत. तुम्ही कसोटी मालिका खेळता त्याच दरम्यान, वनडे संघाचा मालिका सुरू असते. हा वेडपटपणा आहे.' स्टोक्सने एप्रिल महिन्यात इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व आपल्या खांद्यावर घेतले होते. तो नुकताच दुखापतीतून सावरला होता. त्याने काही काळ क्रिकेटमधून मानसिक स्वास्थासाठी ब्रेक घेतला होता.

स्टोक्स म्हणाला की, 'मला असे वाटते की सध्या जे क्रिकेटचे तीनही फॉरमॅट खेळत आहेत त्यांच्यासाठी क्रिकेटचा अतिरेक होत आहे. आता क्रिकेट खेळणं आधीपेक्षा जास्त कठिण झाले आहे. मी आधी तीनही क्रिकेट प्रकार खेळत होतो त्यावेळी क्रिकेटचा अतिरेक होत होता असे वाटत नव्हते.'

Ben Stokes Statement After Retirement Says We Are Not Cars
CWG 2022 :'मैदान बदलले, तुमची जिद्द नाही' PM मोदींच्या खेळाडूंना शुभेच्छा

आयसीसीला प्रत्येक वर्षी निदान एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करू इच्छिते. दरम्यान फ्रेंचायजी क्रिकेटचा आवाका देखील मोठा होत आहे. त्यामुळे खेळाडूंवरचा कामाचा ताण दिवसेंदिवस वाढतच आहे.

याबाबत बेन स्टोक्स म्हणतो 'जेवढे जास्त क्रिकेट खेळले जाईल तेवढे खेळासाठी चांगले आहे. मात्र तुम्हीला उच्च दर्जाची वस्तू हवी आहे. तुम्हाला चांगले खेळाडू कायम जास्तीजास्त क्रिकेट खेळलेले हवे आहेत. हा माझा आणि तुमचा प्रश्न नाही. तुम्ही जगभर पाहिले तर संघ काही खेळाडूंना विश्रांती देत आहेत जेणेकरून त्यांना वाटावे की त्यांनी ब्रेक घेतला आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.