कर्णधार स्टोक्सने पहिल्याच कसोटीत 'खास' जर्सी घालून जिंकली मने

Ben Stokes Wear Graham Thorpe Name Jersey To Pay Tribute
Ben Stokes Wear Graham Thorpe Name Jersey To Pay Tributeesakal
Updated on

लॉर्ड्स : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना लॉर्ड्सवर सुरू झाला. इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार (Captain) म्हणून बेन स्टोक्सचा (Ben Stokes) हा पहिलाच कसोटी (First Test सामना होता. या सामन्यात स्टोक्सने असं काही केलं की त्याने सर्व क्रिकेट रसिकांची मने जिंकली.

लॉर्ड्स सामन्यापूर्वी नाणेफेकीला येताना बेन स्टोक्स एक खास जर्सी घालून आला. या जर्सीद्वारे त्याने इंग्लंडचे दिग्गज माजी खेळाडू ग्रॅहम थॉर्पे (Graham Thorpe) यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. या जर्सीवर थॉर्पे यांचे नाव आणि त्यांच्या कॅपचा नंबर लिहिला होता.

Ben Stokes Wear Graham Thorpe Name Jersey To Pay Tribute
'हम करे तो साला कॅरेक्टर ढिला हैं' म्हणत जाफरने इंग्रजांना दाखवला आरसा

इंग्लंडचे माजी खेळाडू ग्रॅहम थॉर्पे दीर्घकाळापासून आजारी आहेत. अशावेळी इंग्लंडच्या माजी खेळाडूप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी स्टोक्सने त्यांच्या नावाची जर्सी कर्णधार म्हणून खेळत असलेल्या आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यावेळी घातली.

याचबरोबर इंग्लंडचा नवा कर्णधार थॉर्पे यांच्याबद्दल म्हणाला की, 'सर्वांना माहिती आहे की थॉर्पे यांचा प्रकृती गंभीर आहे. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मी सोमवारी त्यांच्या पत्नीशी बोललो होतो. त्यांनी अशा प्रकारे त्यांच्या कुटुंबाला मिळणाऱ्या सन्मानाबद्दल आभार देखील व्यक्त केले आहेत.'

Ben Stokes Wear Graham Thorpe Name Jersey To Pay Tribute
रिझवान म्हणतो, भारतीय खेळाडू पाकिस्तानशी खेळण्यास उत्सुक मात्र...

बेन स्टोक्स पुढे म्हणाला की, 'ही जर्सी घालून मी आणि इंग्लंडच्या क्रिकेट संघाने या कठिण प्रसंगी थॉर्पे, त्यांची पत्नी आणि मुलांना आमचा पाठिंबा दर्शवला आहे. आम्ही सर्व थॉर्पे यांच्यावर प्रेम करतो. ते आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत.' दरम्यान, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव 132 धावात संपुष्टात आला. त्यानंतर इंग्लंडलाही न्यूझीलंडने धक्के देत त्यांची दिवसअखेर 7 बाद 116 धावा अशी अवस्था केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.