Bhavani Devi Fencing Create History : भारताची ऑलिम्पिकपटू भवानी देवीने फेन्सिंगमध्ये इतिहास रचला. चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भवानी देवीने सेमी फायनल गाठली आहे. याचबरोबर तिचे पदक नक्की झाले आहे. एशियन फेन्सिंग चॅम्पियशिपमध्ये यापूर्वी भारताच्या कोणत्याही फेन्सिंगपटूला पदक पटकावता आले नव्हते. हा इतिहास भवानी देवीने रचला.
भवानी देवीने जपानची गतवेळची वर्ल्ड चॅम्पियन मिसाकी इमुराचा क्वार्टर फायनलमध्ये 15 - 10 असा पराभव करत सेमी फायनल गाठली. मात्र सेमी फायनलमध्ये उझबेकिस्तानच्या झायनाब दायिबेकोव्हाने भवानी देवीचा 14 - 15 असा पराभव केल्याने तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
जपानच्या मिसाकीने कैरो येथे झालेल्या 2022 च्या महिला जागतिक फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. क्वार्टर फायनलमध्ये भारताच्या भवानी देवीने तिचा 15 - 10 असा पराभव केला. मात्र सेमी फायनलमध्ये उझबेकिस्तानच्या झायनाबने भवानी देवाची 14 - 15 असा पराभव केला.
भवानी देवीने झायनाबला सेमी फायनलमध्ये कडवी टक्कर दिली. मात्र भवानी देवीला अजून एक इतिहास रचण्यासाठी अवघा 1 गुण कमी पडला. जर भवानी देवीने सेमी फायनल जिंकली असती तर ती एशियन फेन्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारणारी पहिली भारतीय फेन्सर ठरली असती.
भारताच्या 29 वर्षाच्या भवानी देवीला राऊड ऑफ 64 मध्ये बाय मिळाला होता. त्यानंतर तिने कझाकिस्तानच्या डॉस्पे कारिनाचा पुढच्या फेरीत पराभव केला प्री - क्वार्टर फायनलमध्ये भवानीने तिसऱ्या सिडेड ओझाकी सेरीचा 15 - 11 असा पराभव केला होता.
फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव राजीव मेहता यांनी भवानी देवीचं अभिनंदन केलं. ते म्हणाले, 'भारतीय फेन्सिंगसाठी हा खूप अभिमानाचा दिवस आहे. भवानी देवीनं आतापर्यंत कोणाला जमलं नाही ते करून दाखवलं. प्रतिष्ठेच्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. मी भारतीय फेन्सिंग जगताकडून तिचे अभिनंदन करतो.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.