सातारा : आजच्या काळात भारतातील, तसेच आशिया खंडातील सर्वात लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे. गल्ली बोळापासून या क्रिकेटची लोकप्रियता कायम आहे. इंग्लंडचा हा राष्ट्रीय खेळ असून भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, पाकिस्तान व न्यूझीलंड ह्या राष्ट्रकुलातील देशांतही तो लोकप्रिय आहे. भारताचा (India) पहिला अधिकृत कसोटी सामना जून २५, १९३२ रोजी सुरू झाला. १७२१ मध्ये भारतात पहिला क्रिकेट सामना खेळला गेल्याची नोंद आहे. ब्रिटिशांसोबत हा खेळ भारतात आलाय. १८४८ मध्ये मुंबईच्या (Mumbai) पारसी लोकांनी स्थापलेला ओरिएंटल क्रिकेट क्लब हा भारतातील भारतीयांनी स्थापलेला पहिला क्लब आहे. एकोणीसाव्या शतकाच्या सुरवातीस काही भारतीय इंग्लडमध्ये क्रिकेट खेळण्यास गेले. त्यांपैकी रणजीत सिंग व दुलिप सिंग हे लोकप्रिय खेळाडू होते. ह्या दोघांच्या नावाने भारताच्या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय स्पर्धा खेळविण्यात येतात. यावरुन आपल्याला लक्षात आले असेल, की भारतात क्रिकेटला किती महत्व आहे.. (Bhurasingh Yadav Writes Letter Gwalior Jail Spinner Rajinder Goel)
कधी काळी संपूर्ण क्रिकेटवर इंग्लंडचे वर्चस्व होते. मात्र, आज याच खेळावर भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) हुकूमत आहे. याला इतिहासातील दिग्गज क्रिकेटपट्टू अपवाद आहेत. एकेकाळी भारताकडे जबरदस्त स्पिनर्सचा ताफा होता, त्यामुळे भारताच्या कोणीच नादी लागायचे नाही. वेस्ट इंडीजचे वेगवान गोलंदाज आणि भारताचे स्पिनर्स हे समीकरण अख्या जगानं एकोणीसाव्या शतकात पाहिलंय. या दशकात अनेक क्रिकेटपट्टूंनी आपल्या देशाचं नाव उंचवण्यासाठी जीवाच्या आकांतने गोलंदाजी केली, तर फलंदाजीही तितक्याचं ताकदीनं केलीय. पण, काहींच्या बाबतीत निराशाही पहायला मिळालीय. या दुर्दैवी खेळाडूचं नावं आहे राजिंदर गोयल (Rajinder Goel). या खेळाडूनं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर संघात स्थान मिळवायचा प्रयत्न केला, पण त्याच्या पदरी नेहमी निराशाच आली. यातूनही तो खचून न जाता, सराव करत राहिला, परंतु म्हणतात ना सगळं आपल्या बाजूनं असले तरी, नशीब मात्र आपल्यासोबत कधी-कधी नसतंच! असंच काहीसं गोयल यांच्या बाबतीत घडलंय.
राजिंदर गोयल हा आजच्या जमान्यात क्रिकेट खेळाडू असता, तर नक्कीच तो टीव्ही चॅनेलच्या जाहिरातीत सर्वात मोठा ब्रँड ठरला असता. पण, कदाचित हे नियतीला मान्य नव्हते. 1960 ते 1980 च्या दशकात हरियानाचा हा डावखुरा फिरकीपटू प्रथम श्रेणीत 750 विकेट्स घेऊन आला होता. यापैकी रणजी ट्रॉफीच्या 123 सामन्यात त्याने तब्बल 640 विकेट्स घेतल्या आहेत.
गोयल हा एक उत्तम गोलंदाज होता, पण चुकीच्या युगात खेळला गेला. कारण, तेव्हा बिशन सिंह बेदींचं युग सुरु होतं, त्यात गोयल फारकाळ टिकेल याची शाश्वती फार धूसर होती. असं म्हटलं जातं की, गोयल यांची क्रिकेट कारकिर्द बेदींमुळे संपुष्टात आलीय. कारण, तेव्हाचा काळ बेदींच्या मागे लोटांगण घालत होता, त्यामुळे नियतीला गोयल यांची कारकिर्द त्याकाळी दिसली नसावी, असंच म्हणता येईल. आजच्या क्रिकेटर्सकडे जमीन, अलिशान घरे, कोट्यवधी रुपये, महागड्या गाड्या आहेत. मात्र, बेदी आणि गोयल यांच्या काळात क्रिकेटर्संकडे ना अलिशान घरे होती, ना गाडी. त्यांच्याकडे पितळेची ट्रॉफी, वर्तमानपत्रांची मासिके इतकंच काय ते अलिशान होतं. मात्र, आता काळ बदललाय आणि क्रिकेट खेळाडूही!
डाकू भुरासिंग यादवचं फिरकीपटू राजिंदर गोयलांना पत्र
एप्रिल 1985 च्या दुसर्या-तिसर्या आठवड्यात पोस्टमन हे पत्र देण्यासाठी गोयलांच्या घरी गेले. मात्र, त्यांच्या कुटुंबातील लोक घाबरले, कारण प्रेषकाचे नाव 'डाकू भुरासिंग यादव' असे लिहिले गेले होते. भुरासिंग यादव हे त्या काळातले कुख्यात दरोडेखोर होते. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात त्याची मोठी दहशत होती. पण, 8 एप्रिलला ग्वाल्हेर जेलमधून लिहिलेलं हे पत्र वाचून गोयल रडले. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. तुरूंगात बसलेला एखादा माणूस आपल्या कारकिर्दीची अशी पत्राव्दारे प्रशंसा करतो, याचं त्यांना फार नवलं वाटलं, ते मनोमनी खूप समाधानी झाले. त्यावेळी त्यांनी भारतीय क्रिकेटच्या निवडकर्त्यांवर जोरदार टीका केली.
एका दरोडेखोराने राजिंदर गोयल यांच्या घरी एक पत्र पाठवलं. त्यावेळी राजिंदर गोयल हे क्रिकेटच्या मॅचमध्ये व्यस्त असल्याने घरी नव्हते. या पत्रामुळे राजिंदर सिंग यांच्या घरचे प्रचंड घाबरले. या पत्राचा मजकूर पुढीलप्रमाणे होता.
'प्रिय राजिंदर आपको रणजी ट्रॉफी में ६०० से अधिक विकेट लेने कि ख़ुशी में बधाई स्वीकृत हो.
हम आपके बहुत प्रशंसक होकर ये पत्र व्यवहार कर रहे हे.
और भविष्य कि कामना करते हे कि ईश्वर आपको दिन प्रति दिन सफलता दिलवाये…
हे पत्र ८ एप्रिल १९८५ रोजी मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरच्या मध्यवर्ती कारागृहातून डाकू भुरासिंग यादव (Dacoit Bhura Singh Yadav) यांच्याकडून राजीव गोयल यांना पाठवण्यात आले होते.
गोयल आनंदाने सांगतात, क्रिकेटनं मला नाव दिलं, मला मोठं केलं. पण, माझ्याजवळ असं एक पत्र आहे, जे माझ्या आयुष्याचा एक भाग बनलंय. येणाऱ्या काळात माझ्या नातवंडांना आणि पुढच्या पिढीला सांगता येईल, की मीही माझ्या काळात एक सुप्रसिद्ध क्रिकेटपटू होतो. एवढा प्रसिध्द होतो, की एका डाकूनं माझ्या खेळाची प्रशंसा केलीय, त्याचा पुरावा हे पत्र आहे. (ज्यावेळी त्यांनी ६०० विकेट पूर्ण केल्या, त्यावेळी त्यांनी खुलासा केला होता की, भारतीय निवड समितीला माझा खेळ ओळखता आला नाही, त्यांच्यामुळे मला भारताकडून खेळता आलं नाही, पण एका दरोडेखोराने माझ्या खेळाचं कौतुक केलं यातच मी समाधानी आहे असं त्यांनी म्हंटलं होतं.)
गोयल यांच्या सातशे विकेट्सच्या कारकिर्दीत सुनील गावस्कर यांच्या विकेटचा देखील समावेश आहे. आजही ते म्हणतात, की राजिंदरचा सामना करणे फार कठीण होते. गोयलची गोलंदाजी म्हणजे माझ्यासाठी एक मोठं आव्हानच असायचं, असं ते सांगतात.
इतिहासकार रामचंद्र गुहा सांगतात, दोन क्रिकेटर्स होते, जे भारतासाठी खेळू शकले असते, पण खेळले नाहीत. यात राजिंदर गोयल आणि पद्माकर शिवालकर होते. रणजी करंडकातील डावामध्ये 53 वेळा पाच विकेट घेण्याचा विक्रम गोयलांच्या नावावर आहे, तर त्याने 17 वेळा एका सामन्यात 10 फलंदाज बाद केले आहेत.
Bhurasingh Yadav Writes Letter Gwalior Jail Spinner Rajinder Goel
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.