Team India : भारतीय ODI संघात या 2 खेळाडूच्या सोनेरी कारकिर्दीवर संकटाचे ढग

भारताचे तीन स्टार खेळाडू बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहेत आता तर...
Bhuvneshwar Kumar | Shikhar Dhawan | Team India
Bhuvneshwar Kumar | Shikhar Dhawan | Team India
Updated on

Team India : भारतीय संघात खेळणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण टीम इंडियाकडून खेळण्याची संधी फार कमी खेळाडूंना मिळते. भारतीय संघात असे दोन खेळाडू आहेत जे दीर्घकाळापासून एकदिवसीय संघातून बाहेर आहेत. खराब फॉर्ममुळे या खेळाडूंना टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता या खेळाडूंचे भारतीय संघात पुनरागमन करणे कठीण दिसत आहे.

Bhuvneshwar Kumar | Shikhar Dhawan | Team India
Rohit Sharma : वर्षाअखेर पर्यंत रोहित शर्माच्या कॅप्टन्सीला मिळणार नारळ! असे होतील टीम इंडियामध्ये बदल
indian cricket team Bhuvneshwar Kumar
indian cricket team Bhuvneshwar Kumarsakal

भुवनेश्वर कुमारने 2013 साली पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियासाठी पदार्पण केले होते. यानंतर त्याने भारतासाठी 2015 आणि 2019 च्या एकदिवसीय विश्वचषक हे खेळले. 2019 पर्यंत तो टीम इंडियाच्या गोलंदाजीचा एक महत्त्वाचा भाग होता, परंतु त्यानंतर तो चांगली कामगिरी करू शकला नाही आणि संघात आणि बाहेर राहिला.

भारतासाठी त्याने शेवटचा सामना जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर तो टीम इंडियातून बाहेर पडत आहे. त्याची जागा मोहम्मद सिराज सारख्या गोलंदाजांनी घेतली आहे. अशा परिस्थितीत आता त्याचे टीम इंडियात पुनरागमन करणे खूप कठीण दिसत आहे. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत 121 एकदिवसीय सामन्यांमध्ये 141 बळी घेतले आहेत.

Bhuvneshwar Kumar | Shikhar Dhawan | Team India
Team India WTC: भारताची पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘कसोटी’, पुढील अजिंक्यपद मालिकेत टीम इंडिया खेळणार 19 सामने
Shikhar Dhawan
Shikhar Dhawan

शिखर धवनने रोहित शर्मासोबत सलामी दिली आणि भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याने एकदिवसीय संघाचीही जबाबदारी सांभाळली. पण तो त्याच्या नावाप्रमाणे कामगिरी करू शकलेला नाही. याच कारणामुळे बांगलादेश दौऱ्यानंतर धवनच्या जागी शुभमन गिलने सलामीची जबाबदारी स्वीकारली आणि चांगली कामगिरी केली.

गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्येही द्विशतक झळकावले आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 आणि आशिया चषक 2023 मध्येही गिल रोहित शर्मासोबत ओपनिंग करेल अशी अपेक्षा आहे. अशा स्थितीत शिखर धवनचे टीम इंडियात पुनरागमन अवघड वाटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.