Sydney Sixers ला रोखत Perth Scorchers नं मारला जेतेपदाचा चौकार

Big Bash League 2021 22 Perth Scorchers vs Sydney Sixers Final
Big Bash League 2021 22 Perth Scorchers vs Sydney Sixers Final Sakal
Updated on
Summary

पहिल्यांदा फलंदाजी करताना पर्थ स्कॉचर्सची सुरुवात खराब झाली होती, पण...

Big Bash League 2021 22 Perth Scorchers vs Sydney Sixers Final : ऑस्ट्रेलियातील पुरुष बिग बॅश लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पर्थ स्कॉचर्सनं बाजी मारली. गत विजेत्या सिडनी सिक्सरला पराभूत करत पर्थ स्कॉचर्सनं चौथ्यांदा बीबीएलचे जेतेपद पटकावले. अँड्र्यू टायचा (Andrew Tye) भेदक मारा आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेली सुरेख साथ याच्या जोरावर पर्थ स्कॉचर्सनं सिडनीला रोखत जेतेपदाचा चौकार खेचला.

मेलबर्नच्या डॉकलंड स्टेडियमवर (Docklands Stadium, Melbourne ) रंगलेल्या फायनल लढतीत सिडनी सिक्सर्सचा कर्णधार हॅन्रिक्सनं (Moises Henriques) टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना पर्थ स्कॉचर्सची सुरुवात खराब झाली. धावफलकावर अवघ्या 25 असताना आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले. पॅटरसन (Kurtis Patterson) 1 (4), जोश इलिंग्स (Josh Inglis) 13(13), मिशेल मार्श (Mitchell Marsh) 5 (11) आणि कॉलिन मुन्रो 1 (5) धावा करुन माघारी फिरले. कर्णधार टर्नरनं (Ashton Turner) 35 चेंडूत 54 धावांची खेळी करुन संघाचा डाव सावरला. दुसऱ्या बाजूला लॉरी इवन्सनं (Laurie Evans) 41 चेंडूत नाबाद 76 धावा कुटत संघाच्या धावफलकावर निर्धारित 20 षटकात 6 बाद 171 धावा लावल्या होत्या.

Big Bash League 2021 22 Perth Scorchers vs Sydney Sixers Final
Australian Open: मेदवेदेवने त्सित्सिपसचा कडावा प्रतिकार मोडून काढत गाठली फायनल

या धावांचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर्सची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर (Hayden Kerr) अवघ्या 2 धावांची भर घालून माघारी फिरला. डॅनिएल ह्युजेसच्या Daniel Hughes 42 धावा वगळता एकाही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. त्याच्याशिवाय निकोलसच्या Nicholas Bertus 15 धावा आणि जय लेन्टनच्या Jay Lenton (wk) 10 धावा वगळता एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी सिडनी सिक्सर्सचा डाव 16.2 षटकात 92 धावांत आटोपला. पर्थकडून अँड्र टायने सर्वाधिक 3 तर जाय रिचर्डसन याने 2 विकेट घेतल्या.

Big Bash League 2021 22 Perth Scorchers vs Sydney Sixers Final
सीएसकेचा 'थलायवा' चेन्नईत दाखल; ट्विटरवर धुमाकूळ

याआधी पर्थ स्कॉचर्सनं 2014, 2015 आणि 2017 असे तीन हंगामात जेतेपद पटकावले होते. आता त्यांनी चौथ्यांदा जेतेपदावर नाव कोरले. दुसरीकडे सिडनी सिक्सर्सनं 2012, 2020 आणि 2021 मध्ये जेतेपदावर नाव कोरले होते. गतविजेत्यांनी दिमाखात फायनल गाठली. पण फायनलमध्ये रुबाब दाखवण्यात ते कमी पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.