BBL 2021: मॅक्सवेलच्या संघाचा फुसका बार; 61 धावांत ऑल आउट!

ऑस्ट्रेलियात बिग बॅश टी-20 लीगचा थरार सुरु
BBL 2021
BBL 2021Twitter
Updated on

ऑस्ट्रेलियात बिग बॅश टी-20 लीगचा थरार सुरु

एका बाजूला अनेक देशांत द्विपक्षीय कसोटी मालिका सुरु असताना ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग स्पर्धेला सुरुवात झालीये. रविवारी बिग बॅश 2021 च्या हंगामातील पहिला सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सिडनी सिक्सर्सने पहिल्याच सामन्यात 213 धावांचा डोंगर उभारल्याचे पाहायला मिळाले. या धावांचा पाठलाग करताना मेलबर्नचा संघ अवघ्या 61 धावांत आटोपला.

बिग बॅश लीगच्या सलामीच्या सामन्यात मेलबर्न संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याच निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. सिडनीच्या सलामीवीरांनी पहिल्या 9 षटकात 90 धावांची भागीदारी करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. जोश फिलीपने 47 चेंडूत 83 धावा केल्या तर दुसऱ्या बाजूनं जेम्स विन्सने 29 चेंडूत 44 धावा कुटल्या. कर्णधार मोइजिज हेन्रिक्सने 38 चेंडूत 76 धावांची जबरदस्त खेळी केली. सिडनी सिक्सर्सने निर्धारित 20 षटकात 213 धावा केल्या आहेत.

BBL 2021
VIDEO : 'टॉम डिक आणि हॅरी' तीन विकेट किपरमधील रन आउटचा खेळ!

धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मेलबर्न स्टार्सला पहिल्या षटकापासूनच धक्यावर धक्के बसण्यास सुरुवात झाली. ठराविक अंतराने विकेट पडण्याचा सिलसिला कायम राहिल्याने मेलबर्न स्टार्स संघाचा डाव 61 धावांत आटोपला. सिडनी सिक्सर्सकडून स्टीव्ह ओ कीफने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. दुसऱ्या बाजूला शॉन एबोटने उत्तम साथ देत 3 विकेटसह संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मेलबर्न स्टार्सचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेल याने चार धावा केल्या. त्याचा अख्खा संघ 11.1 षटकात गारद झाला. या स्पर्धेतील फायनल लढत 28 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.

BBL 2021
VIDEO : फिरत्या कॅमेऱ्यानं थांबवला खेळ; वानखेडेवर झाला घोळ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.