BBL Finalist : Sydney Sixers vs Perth Scorchers फायनल कोण मारणार?

Big Bash League Sydney Sixers And Perth Scorchers
Big Bash League Sydney Sixers And Perth Scorchers Sakal
Updated on

BBL 11 Final : ऑस्ट्रेलियात सुरु असलेली बिग बॅश लीग (Big Bash League) स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. या स्पर्धेतील अंतिम दोन संघ पक्के ठरले आहेत. चॅलेंजर राउंडमध्ये एडलिड स्टायकर्सला ( Adelaide Strikers) पराभूत करत सिडनी सिक्सर्स संघानं (Sydney Sixers) फायनल गाठली आहे. बुधवारी या दोन्ही संघात रंगलेल्या सामन्यात एडलिड स्टायकर्स संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 षटकात 4 बाद 167 धावा केल्या होत्या.

एलेक्स कॅरी 1 (2) आणि शॉर्ट 6(5) धावा करुन स्वस्तात माघारी फिरल्यानंतर Ian Cockbain याने 42 चेंडूत 48 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. हेड अवघ्या तीन धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर वेल्सनं 47 चेंडूत नाबाद 62 धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने 5 चौकार आणि एक षटकार खेचला. दुसऱ्या बाजूला रेनशॉनं त्याला उत्तम साथ दिली. त्याने 20 चेंडूचा सामना करताना 36 धावा केल्या.

Big Bash League Sydney Sixers And Perth Scorchers
पक्क ठरलंय! रोहितच घेणार विराटची जागा; पण...

168 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हेन्रिक्सच्या (Moises Henriques) नेतृत्वाखखालील सिडनी सिक्सर्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जस्टीन (Justin Avendano) अवघ्या एका धावेची भर घालून तंबूत परतला. जॅक (Jake Carder) 10 (13), हेन्रिक्स (Moises Henriques) 13 (16) आणि डॅनिल ख्रिस्टन (Daniel Christian) 1 (4) ही स्वस्तात माघारी फिरला. सलामीवीर Hayden Kerr एका बाजूनं खिंड लढवली. त्याने 58 चेंडूत नाबाद 98 धावांची खेळी केली. त्याने आपल्या या खेळीत 10 चौकार आणि 2 षटकार खेचले. सीन एबॉटनं (Sean Abbott ) त्याला सुरेख साथ दिली. त्याने 20 चेंडूत 41 धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर सिडनी सिक्सर्सने 4 विकेट राखून सामना जिंकत फायनल गाठली.

Big Bash League Sydney Sixers And Perth Scorchers
Rohit Is Back : फिटनेस टेस्टमध्ये हिटमॅन पास

आता सिडनी सिक्सर्स (Sydney Sixers) आणि मिशेल मार्शच्या (Mitchell Marsh) नेतृत्वाखालील पर्थ स्कॉचर्स (Perth Scorchers) यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. 28 जानेवारीला बिग बॅश लीगचा विजेता कोण हे ठरेल. दोन्ही संघात तगडी फाईट होणं अपेक्षित आहे. पर्थ 2014, 2015 आणि 2017 असे तीन हंगामात जेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे सिडनी सिक्सर्सनं 2012, 2020 आणि 2021 मध्ये जेतेपदावर नाव कोरले होते. दोन्ही संघ जेतेपदाचा चौकार खेचण्यास उत्सुक असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.