Ganguly - Kohli : 'कोहलीला मी हटवले नाही तर...' सौरव गांगुलीचा विराटच्या कर्णधारपदावरून मोठा खुलासा

Sourav Ganguly and Virat Kohli Controversy
Sourav Ganguly and Virat Kohli Controversysakal
Updated on

Sourav Ganguly and Virat Kohli Controversy : काही वर्षांपूर्वी सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यातील वादाची बरीच चर्चा झाली होती. विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्यावरून हा वाद झाला होता, त्यानंतर विराट कोहलीने सर्व फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडले. आता सौरव गांगुलीने बीसीसीआय अध्यक्ष असताना विराटशी कर्णधारपदाबाबत काय बोलणे झाले होते ते सांगितले आहे.

सध्या विराट कोहली टीम इंडियाच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. महेंद्रसिंग धोनीनंतर विराट कोहलीने दीर्घकाळ क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले, पण त्याला एकदाही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही.

मात्र, विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया प्रत्येक फॉरमॅटमध्ये नंबर-1 संघ बनली. यासोबत परदेशी खेळपट्ट्यांवरही विजय मिळवला, परंतु आयसीसी स्पर्धेत एकदाही संघ विजेता होऊ शकला नाही.

Sourav Ganguly and Virat Kohli Controversy
Team India : वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाच्या खेळाडूने उचललं मोठं पाऊल! 'या' टीमसोबत खेळण्याची केली घोषणा

ICC टी-20 वर्ल्ड कप 2021 सुरू होण्यापूर्वीच विराट कोहलीने घोषणा केली होती की या स्पर्धेनंतर तो टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देईल. विराटच्या नेतृत्वाखालील त्या शेवटच्या आयसीसी स्पर्धेतही टीम इंडियाचा पराभव झाला होता.

त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली होते. गांगुलीने विराटशी चर्चा केली होती, त्यानंतर विराटने सर्व फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडले आणि गांगुलीसोबतच्या त्याच्या वादाच्या बातम्या मीडियामध्ये चर्चेत आल्या.

आता सौरव गांगुलीने दादागिरी अनलिमिटेड सीझन 10 दरम्यान कर्णधारपदाबाबत विराटशी झालेल्या संभाषणाचा खुलासा केला आहे. सौरव गांगुली म्हणाला, "मी विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवले नाही. तर मी त्याला सांगितले की, जर तुला टी-20 मध्ये संघाचे नेतृत्व करायचे नसेल, तर तु संपूर्ण पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून कर्णधारपद सोडले, तर चांगले होईल.

Sourav Ganguly and Virat Kohli Controversy
शूटिंग रेंजमध्ये मोठा अपघात! पिस्तूल गॅस सिलिंडरच्या स्फोटाचा फटका अन् नेमबाजाने गमावला डावा अंगठा

मात्र, एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधारपदाबाबत विराट कोहलीने आपल्या एका वक्तव्यात म्हटले होते की, वनडे क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याबाबत त्याच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. त्यानंतर विराटने कसोटीचे कर्णधारपदही सोडले आणि त्यानंतर रोहित शर्माला तिन्ही फॉरमॅटचे कर्णधार बनवण्यात आले.

उल्लेखनीय म्हणजे विराट कोहलीनंतर टीम इंडियाला आजपर्यंत तिन्ही फॉरमॅटसाठी एकही कर्णधार मिळू शकलेला नाही. बीसीसीआय जवळजवळ प्रत्येक मालिकेत नवीन कर्णधार आणत आहे. आणि गेल्या 2 वर्षांत अनेक खेळाडूंनी टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही टीम इंडियाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव, एकदिवसीय संघाचा कर्णधार केएल राहुल आणि कसोटी कर्णधार रोहित शर्मा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()