पॅरा एशियन स्पर्धेत ते लाभार्थ्यांच्या यादीत हमखास झळकले आहेत. विशेष म्हणजे यात नेमबाजांनी बाजी मारलीये.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील (International) स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडूंचा (Kolhapur Player) झेंडा सातत्याने फडकत राहिला आहे. २०१५ ते २०२३ दरम्यान जिल्ह्यातील खेळाडू शासनाच्या रोख रकमेचे मानकरी ठरले आहेत.
ऑलिम्पिक, विश्व अजिंक्यपद, एशियन, राष्ट्रकुल, युवा राष्ट्रकुल, एशियन चॅम्पियनशिप (Asian Championship), यूथ ऑलिम्पिक/ज्युनिअर एशियन/विश्व अजिंक्यपद/शालेय आशियाई, पॅरा ऑलिम्पिक (Paralympics) असो की, पॅरा एशियन स्पर्धेत ते लाभार्थ्यांच्या यादीत हमखास झळकले आहेत. विशेष म्हणजे यात नेमबाजांनी बाजी मारली असून, त्यांना ३ कोटी ६६ लाख रुपये इतके रोख बक्षीस मिळाले आहे. २०१८ - १९ मध्ये २ कोटी ६२ लाख रक्कम मिळाली आहे.
२०१५-१६
आशियाई पिस्टल नेमबाजी - कांस्य
राष्ट्रकुल नेमबाजी - सुवर्ण
२०१६-१७
आशियाई पॉवरलिफ्टिंग - एक रौप्य व एक कांस्य
वरिष्ठ राष्ट्रकुल - कुस्ती - एक सुवर्ण व एक रौप्य
१३ वी एशियन चॅम्पियनशिप - नेमबाजी - तीन सुवर्ण व एक रौप्य
९ वी एशियन चॅम्पियनशिप - नेमबाजी - सांघिक सुवर्ण
पॅरा एशियन - जलतरण - कांस्य
तिसरी आशियाई - खो-खो - दोन सुवर्ण
२०१८-१९
नेमबाजी - ५० मीटर रायफल - सुवर्ण
एशियन गेम्स - नेमबाजी - सुवर्ण
ज्युनिअर आशियाई - कुस्ती - कांस्य
यूथ ऑलिम्पिक- नेमबाजी - रौप्य
२०१९-२०
कॉमनवेल्थ शूटिंग - नेमबाजी - कांस्य
आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कप - नेमबाजी - सुवर्ण
५२ वी आयएसएसएफ ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियशिप - नेमबाजी - एक रौप्य व एक कांस्य
२०२१-२२
ज्युनिअर एशियन - कुस्ती - रौप्य
१४ वी एशियन - नेमबाजी - सुवर्ण व कांस्य
आयएसएसएफ ज्युनिअर वर्ल्ड कप - नेमबाजी - सुवर्ण
१८ वी एशियन - रोलर स्केटिंग - कांस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.