Olympics : मेरी कोम-मनप्रीतसह पुनियाला ध्वजवाहकाचा मान

कुस्तीमध्ये पदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या बजरंग पुनियालाही ध्वजवाहकाचा मान मिळालाय.
Bajrang Punia  MC Mary Kom And Manpreet Singh
Bajrang Punia MC Mary Kom And Manpreet Singh E sakal
Updated on

भारतीय ऑलम्पिक महासंघाने (IOA) जगातील मानाची स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी (Tokyo Olympics ) ध्वजवाहकांची निवड केलीय. उद्घाटन समारंभावेळी ध्वजवाहकाचा मान हा भारताची दिग्गज बॉक्सर एमसी मेरी कोम आणि हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह यांना मिळाला आहे. भारतीय ऑलिम्पिक महासंघाने याची घोषणा केली. 23 जैलैपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेत मेरी कोम आणि मनप्रीत सिंह भारतीय खेळाडूंच्या पथकाचे नेतृत्व करताना दिसतील. कुस्तीमध्ये पदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या बजरंग पुनियालाही ध्वजवाहकाचा मान मिळालाय. 8 ऑगस्ट रोजी समारोह कार्यक्रमात बजरंग पुनिया ध्वजवाहकाची भूमिका बजावताना दिसेल. (Boxer MC Mary Kom And Hockey Player Manpreet Singh to be flag bearers of Indian contingent at Tokyo Olympics opening ceremony)

ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताकडून महिला आणि पुरुष गटातून दोन ध्वजावाहकांची नियुक्ती करण्यात आलीये. जगातील मानाच्या स्पर्धेच्या व्यासपीठावरुन स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी भारताकडून दोन ध्वजवाहकांची निवड करण्यात येणार असल्याची घोषणा यापूर्वीच आयओए प्रमुख नरिंदर बत्रा यांनी केली होती. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्रा ध्वजवाहक म्हणून दिसला होता. कोरोनाच्या संकटामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 1 वर्षांनी पुढे ढकलण्यात आली आहे. 23 जुलैपासून या स्पर्धेला सुरुवात होतेय. या स्पर्धेत भारताकडून 100 हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.

Bajrang Punia  MC Mary Kom And Manpreet Singh
द्रविड शास्त्रींची जागा घेईल? कपिल पाजींचे थेट मत

ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये भारताला पदक मिळवून देणारी मेरी कोम एकमेव महिला खेळाडू आहे. 2012 लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत 51 किलो वजनी गटातील फ्लायवेट प्रकारात तिने कांस्य पदकाची कामाई केली होती. मेरी कोमच्या नावे वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक पदके मिळवण्याचा विक्रम आहे. मेरी कोमने या स्पर्धेत 6 सुवर्ण पदक, 1 रोप्य पदक आणि एक कांस्य पदक जिंकले आहे. पुरुष गटातील क्युबाचा बॉक्सर पेलिक्स सेवॉन याचा 7 पदकांचा विक्रम मेरी कॉमने मागे टाकला होता.

Bajrang Punia  MC Mary Kom And Manpreet Singh
इतिहास रचणाऱ्या जलपरीचा खास अंदाज; पाहा फोटो

एमसी मेरी कोम हिने आशिया/ ओसनिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतील सेमीफायनल गाठत ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले होते. जागतिक बॉक्सिंग रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या मेरी कोमने क्वार्टरफायनलमध्ये फिलीपाईन्सची आयरिश मॅग्नोला 5-0 असे पराभूत केले होते. ती दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाली असून तिच्याकडून पदकाची आशा आहे. ऑलिम्पिकमध्ये गोल्डन कामगिरी करुन कारकिर्दीला पूर्णविराम देण्यासाठी मेरी कोम उत्सुक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.