Pele hospitalized : FIFA महान फुटबॉलपटू पेले रुग्णालयात दाखल! कॅन्सरशी देत आहेत झुंज

Brazilian football legend Pele hospitalized again amid battle with cancer
Brazilian football legend Pele hospitalized again amid battle with cancer
Updated on

Pele hospitalized : कतारमध्ये खेळल्या जाणार्‍या फिफा विश्वचषक 2022 दरम्यान एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. ब्राझीलचा माजी महान फुटबॉलपटू पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेले कर्करोगाशी झुंज देत आहेत. यावेळी त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची मुलगी नॅसिमेंटोने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. गंभीर असे काहीही नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Brazilian football legend Pele hospitalized again amid battle with cancer
FIFA WC22 : बाद फेरीत पोहोचण्यासाठी ई गटात चारही संघांत चुरस; माजी विजेत्या जर्मनीचा कस लागणार

ब्राझीलमध्ये एका वृत्त पत्रात लिहिले आहे की, पेले यांना सूज आल्याने अल्बर्ट आइनस्टाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली आहे. यानंतर पेलेची मुलगी केली नॅसिमेंटो हिने इंस्टाग्रामवर पोस्ट करत सत्य सांगितले. तिने लिहिले, आज माझ्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल मीडियामध्ये खूप बातम्या येत आहेत. ते नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नाही.

Brazilian football legend Pele hospitalized again amid battle with cancer
FIFA WC22 : 'फ' गटात युरोपातील बलाढ्य संघ अडचणीत! मोरोक्कोला बाद फेरी गाठण्याची सुवर्णसंधी

सात महिन्यांपूर्वीही पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नियमित तपासणी करून तो बाहेर आले. सप्टेंबर 2021 मध्ये 82 वर्षीय पेले यांच्या कोलन ट्यूमर काढण्यात आला होता. तेव्हापासून नियमित रुग्णालयात जातो आहे. ईएसपीएन ब्राझीलने नोंदवले की पेले यांना हृदयविकाराचा त्रास होता आणि त्यांच्या केमोथेरपी उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल त्यांच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांनी चिंता व्यक्त केली. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

Brazilian football legend Pele hospitalized again amid battle with cancer
FIFA 2022 : अर्जेंटिना बाद फेरीत! पराभवानंतरही पोलंड अंतिम-16 मध्ये...

पेलेने ब्राझील तीन वेळा विश्वविजेता बनवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ब्राझीलने 1958, 1962 आणि 1970 मध्ये विश्वचषक जिंकला होता. 1958 च्या विश्वचषक फायनलमध्ये सुदान विरुद्ध दोन गोल केले. पेलेने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत एकूण 1363 सामने खेळले आणि 1281 गोल केले. त्याने ब्राझीलसाठी 91 सामन्यात 77 गोल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.