World Chess Championship स्पर्धेतून कार्लसनची माघार; नवा विश्‍वविजेता मिळणार

बुद्धिबळविश्‍वाला २०१३ नंतर अर्थातच तब्बल नऊ वर्षांनंतर नवा विश्‍वविजेता मिळणार हे निश्‍चित
Magnus Carlsen
Magnus Carlsensakal
Updated on

World Chess Championship : बुद्धिबळाच्या पटावर एकापेक्षा एक चाली रचून प्रतिस्पर्ध्याला चीतपट करणाऱ्या मॅग्नस कार्लसन याने बुधवारी अनपेक्षित निर्णय घेत तमाम चाहत्यांना धक्का दिला आहे. २०२३ मध्ये होत असलेल्या विश्‍व अजिंक्यपदाच्या लढतीमधून त्याने माघार घेतली आहे. यामुळे आता रशियाच्या इयान नेपोम्नियातचीसमोर या लढतीत चीनच्या डिंग लिरेनचे आव्हान असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुद्धिबळविश्‍वाला २०१३ नंतर अर्थातच तब्बल नऊ वर्षांनंतर नवा विश्‍वविजेता मिळणार हे निश्‍चित झाले आहे.

Magnus Carlsen
गांगुली, शहा यांना मुदतवाढ?, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

२०१३ पासून बुद्धिबळविश्‍वात कार्लसन राज्य सुरू होते. कार्लसन पाच वेळा विश्‍वविजेता ठरला आहे. तसेच तीन वेळा त्याने जलद बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपदही मिळवले आहे. एवढेच नव्हे, तर पाच वेळा त्याने जागतिक ब्लिटझ्‌ स्पर्धेच्या जेतेपदावरही मोहोर उमटवली आहे; मात्र आता तो विश्‍वकरंडकाच्या जेतेपदाच्या लढतीत खेळण्यास इच्छुक नाही. कार्लसन याने आपले प्रायोजक युनिबेट यांच्या कार्यक्रमादरम्यान आपले मत व्यक्त केले. या वेळी तो म्हणाला, विश्‍वकरंडकात न खेळण्याबाबत मी माझ्या टीमसह, फिडे तसेच इयान नेपोम्नियातची यांना सांगितले आहे, असेही स्पष्ट मत पुढे त्याने व्यक्त केले.

फिरॉझाविरुद्ध खेळायचे होते

कार्लसन याने २०२१ मधील विश्‍वकरंडकाच्या जेतेपदाच्या लढतीत नेपोम्नियातची याला ५-१ अशा फरकाने सहज पराभूत करीत पाचव्यांदा विश्‍वविजेता होण्याचा मान संपादन केला होता. कार्लसनसमोर एकही खेळाडू आव्हान उभे करू शकला नाही. त्यानंतर तो म्हणाला, १९ वर्षीय फ्रान्सच्या एलीरेझा फिरॉझा याने कँडीडेट स्पर्धा जिंकायला हवी. त्यानंतरच मी पुढची विश्‍वकरंडकाची लढत खेळेन; अन्यथा मी ही लढत खेळणार नाही, असे कार्लसन म्हणाला.

Magnus Carlsen
पाकिस्तानकडून भारताला फायदा; श्रीलंकेला हरवल्यानंतर WTC मध्ये मोठे फेरबदल

मला आता जास्त काही मिळवायचे नाही. विश्‍वकरंडकाचा सामना हा ऐतिहासिक असेल यात शंका नाही, पण या लढतीत खेळावे असे वाटत नाही. या लढतीत खेळू नये याचा विचार मी एक वर्ष आधीपासूनच सुरू केला होता.

- मॅग्नस कार्लसन, पाच वेळचा विश्‍वविजेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.