ICC ची मोठी कारवाई, झिम्बाब्वेच्या धाकड फलंदाजावर घातली बंदी

Brendan Taylor Banned By ICC : टेलवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आलेले आहेत.
Brendan Taylor
Brendan Taylor Team eSakal
Updated on

ICC ने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि फलंदाज ब्रेंडन टेलरवर (Brendan Taylor) साडेतीन वर्षांची बंदी घातली आहे. भ्रष्टाचारविरोधी संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल आयसीसीने टेलरला दोषी ठरवले आहे. एका भारतीय बुकीकडून स्पॉट फिक्सिंगसाठी पैसे घेतल्याप्रकरणी टेलर दोषी ठरला होता. खुद्द टेलरनेच काही दिवसांपूर्वी हा खुलासा केला होता. (Brendan Taylor Banned By ICC)

Brendan Taylor
Sydney Sixers ला रोखत Perth Scorchers नं मारला जेतेपदाचा चौकार

"झिम्बाब्वेचा माजी कर्णधार ब्रॅंडन टेलरवर ICC भ्रष्टाचार विरोधी संहितेच्या तरतुदींचा भंग केल्याचे चार आरोप आणि ICC अँटी-डोपिंग कोडचा एक आरोप स्वीकारल्यानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून साडेतीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे." आयसीसीने म्हटलं आहे. टेलरने 24 जानेवारी रोजी सांगितलं होते की, एका भारतीय व्यावसायिकासोबतच्या भेटीत कोकेन सेवन केल्यानंतर त्याला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं. त्या व्यावसायिकाने केलेल्या भ्रष्ट ऑफरची वेळेवर तक्रार न केल्यामुळे त्याला अनेक वर्षांच्या बंदीला सामोरं जावं लागू शकतं, असंही टेलरने म्हटलं होतं.

Brendan Taylor
सीएसकेचा 'थलायवा' चेन्नईत दाखल; ट्विटरवर धुमाकूळ

भारतीय व्यावसायिकाने त्याला भारताचे "प्रायोजकत्व" करण्यासाठी आणि झिम्बाब्वेमध्ये टी -20 स्पर्धेसाठी योजनांवर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. व्यावसायिकाचं नाव न सांगता, त्यानं सांगितलं की त्याला ऑक्टोबर 2019 मध्ये 15,000 डॉलरची ऑफर देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.