Video: ब्रेट ली म्हातारा झाला तरी ठरतोय 'इंडिया'ची डोकेदुखी

Brett Lee Sensational Last Over Sensational Cause of India Maharaja Defeat In Legend League Cricket
Brett Lee Sensational Last Over Sensational Cause of India Maharaja Defeat In Legend League Cricket esakal
Updated on

मस्कत: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली (Brett Lee) निवृत्तीच्या आधी देखील भारताची डोकेदुखी ठरायचा. आता निवृत्तीनंतरही त्याने भारतीय फलंदाजांना आपल्या भन्नाट वेगाने कोंडीत पकडणे सुरूच ठेवले आहे. लेजंड लीग क्रिकेटमध्ये (Legends League Cricket) वर्ल्ड जायंट्सकडून (World Giants) खेळणाऱ्या ब्रेट लीने अखेरच्या षटकात इंडिया महाराजाचा (India Maharajas) विजयी घास हिरावून घेतला. _(Brett Lee Sensational Last Over Cause of India Maharaja Defeat In Legend League Cricket)

Brett Lee Sensational Last Over Sensational Cause of India Maharaja Defeat In Legend League Cricket
रणजी ट्रॉफी घेण्याबाबत जय शहा म्हणाले...

लेजंड लीग क्रिकेट स्पर्धेत इंडिया महाराजा आणि वर्ल्ड जायंट्स यांच्यात रोमहर्षक सामना झाला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात इंडिया महाराजाला (India Maharaja) शेवटच्या सहा चेंडूत विजयासाठी ८ धावांची गरज होती. त्यावेळी ब्रेट लीने (Brett Lee) अखेरच्या षटकात फक्त २ धावा दिल्या. त्यामुळे इंडिया महाराजाचा ६ धावांनी पराभव झाला.

Brett Lee Sensational Last Over Sensational Cause of India Maharaja Defeat In Legend League Cricket
Australian Open: राफा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर; फायनलमध्ये केला प्रवेश

शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या ब्रेट लीने (Brett Lee) पहिलाच चेंडू वाईड टाकला. त्यानंतर मात्र पुढच्या चेंडूवर त्याने इरफान पठाणला (Irfan Pathan) बाद करत भारताला मोठा धक्का दिला. इरफान पठाण चांगली फलंदाजी करत होता. त्याने २१ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकार ठोकत ५६ धावा केल्या होत्या.

त्यानंतर ब्रेट लीच्या पुढच्या पाच चेंडूवर इंडिया महाराजाला फक्त १ धाव करता आली. रजत भाटिया १२ धावा करून धावबाद झाला. त्यामुळे इंडिया महाराजाचा ५ धावांनी पराभव झाला. वर्ल्ड जायंटने हर्षल गिब्जच्या ४६ चेंडूत ठोकलेल्या ८९ धावांच्या जोरावर ५ बाद २२८ धावा केल्या होत्या. इंडिया महाराजाकडून मुनाफ पटेलने २ तर स्टुअर्ट बिन्नी, रजत भाटिया आणि इरफान पठाणने प्रत्येकी १ विकेट घेतली.

Brett Lee Sensational Last Over Sensational Cause of India Maharaja Defeat In Legend League Cricket
सचिन रोहित-राहुल जोडी आणि वर्ल्डकप ट्रॉफीबद्दल काय म्हणाला?

इंडिया महाराजाने वर्ल्ड जायंट्सच्या २२८ धावांना चोख प्रत्युत्तर दिले. नमन ओझाने (Naman Ojha) ५१ चेंडूत ९५ धावांची धडाकेबाज खेळी केली. यात ८ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. इरफान पठाणनेही अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाच्या जवळ पोहचवले. युसूफ पठाणने देखील २२ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. मात्र अखेरच्या षटक टाकणाऱ्या ब्रेट लीने इंडिया महाराजाच्या विजयात खोडा टाकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.