Virat Kohli Brian Lara : विराट कोहलीचं वय किती....? सचिनचा विक्रम मोडंण अवघड; लारानं गणितच मांडलं

Virat Kohli Brian Lara
Virat Kohli Brian Laraesakal
Updated on

Virat Kohli Brian Lara : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम विराट कोहलीच मोडू शकतो हे खुद्द सचिन तेंडुलकरनेच भाकित केलं होतं. विराट देखील 80 शतके ठोकून विक्रम मोडण्याच्या दृष्टीने आघाडीवर आहे. मात्र वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लाराच्या मते विराट कोहली सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणे महाकठिण आहे.

ब्रायन लारा आनंदबाजार पत्रिकाशी बोलताना म्हणाला की, 'विराट कोहलीचं वय काय? 35 बरोबर ना? त्याने सध्या 80 शतके केली आहेत. त्याला अजून 20 शतके ठोकणे गरजेचे आहे. जर त्याने वर्षाला 5 शतके ठोकायची म्हटलं तरी सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी त्याला अजून चार वर्षे लागतील. त्यावेळी कोहली 39 वर्षाचा असेल. हे खूप अवघड काम आहे खूपच अवघड.'

Virat Kohli Brian Lara
Jasprit Bumrah : शांत राहणं कधी कधी... मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराहबाबत केलं 'क्रिप्टिक' ट्विट

लारा पुढे म्हणाला की, 'विराट विक्रम मोडेलच हे खात्रीने कोणी सांगू शकणार नाही. जे सांगतील ते क्रिकेटिंग लॉजिकने बोलत नाहीयेत. 20 शतकं ठोकणं हा खूप लांबचा पल्ला आहे. अनेक क्रिकेटपटूंनी तेवढी शतकं आपल्या संपूर्ण कारकिर्दीत केलेली नसतात. त्यामुळे मी कोहली विक्रम मोडेल असं सांगण्याचं धाडस करणार नाही.'

'वय कोणासाठीही थांबत नाही. कोहली अनेक विक्रम मोडू शकतो मात्र शंभर शतकांचा विक्रम मोडणं खूप अवघड आहे. कोहली त्याच्या जवळ पोहचू शकतो. मी कोहलीच्या शिस्त आणि समर्पण वृत्तीचा फॅन आहे. त्याचे तुम्ही फॅन कसे असू शतक नाही. तो सामन्याची तयारी करताना आपलं सर्वस्व देतो.'

Virat Kohli Brian Lara
ICC T20 World Cup New Logo : सळसळत्या उर्जेचे प्रतीक! आयसीसीकडून टी 20 वर्ल्डकपच्या नव्या लोगोचे अनावरण

ब्रायन लारा म्हणाला, 'माझ्या त्याला शुभेच्छा आहेत. जर त्यानं सचिन तेंडुलकरचे शतकांच्या शतकाचा विक्रम मोडला तर मी खूप खूष होईन. सचिन हा माझा खूप जवळचा मित्र आहे आणि मी कोहलीचा मोठा फॅन आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.