Brij Bhushan Sharan Singh : आता मी खुला सांड... तिकीट नाकारलेल्या ब्रिजभूषणनं कोणाला दिलं आव्हान?

Brij Bhushan Sharan Singh
Brij Bhushan Sharan Singh esakal
Updated on

Brij Bhushan Sharan Singh : भाजपचा खासदार आणि महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झालेला ब्रिज भूषण शरण सिंह याला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलं. त्याच्यावर भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यात ब्रिजभूषणने आता एक अजब वक्तव्य केलं. तो म्हणाला की तो आता खुल्ला सांड असून तो कोणाला भिडू शकतो.

Brij Bhushan Sharan Singh
Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

भारतीय कुस्ती महासंघाचा माजी अध्यक्ष ब्रिजभूषणविरूद्ध दिल्ली कोर्टानं 10 मे रोजी आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते. भाजपने कैसरगंज मधून ब्रिजभूषण ऐवजी त्याचा मुलगा करण सिंहला तिकीट दिलं आहे.

दरम्यान, मुलाच्या प्रचारावेळी ब्रिजभूषण म्हणाला की, 'मी काही म्हातारा झालेलो नाही किंवा निवृत्त देखील झालेलो नाही. मी आता गोंडामध्ये जास्त वेळ घावलणार आहे. तुमच्या आनंदात आणि दुःखात मी तुमच्या सोबत असणार आहे. आता माझं एकच उद्दिष्ट आहे. निरोगी गोंडा!

Brij Bhushan Sharan Singh
IPL 2024 : 'तुम्ही मला अन् धोनीला शेवटच एकत्र खेळताना...' RCB vs CSK सामन्यापूर्वीच विराट कोहलीच्या वक्तव्याने उडाली खळबळ

लोकांशी बोलताना ब्रिजभूषण म्हणाला की, 'स्थानिकांचे ट्रॅफिक जाम, फ्लाय ओव्हरची कमतरता आणि पूल, पूर या सर्व समस्या ऐकून घेणार आहे. जरी मी लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी नसलो तरी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणार आहे. तुम्ही दोन खासदार निवडून देणार आहेत. आता मी खुला सांड झालो आहे. कोणाशीही लढू शकतो. आमचं कोण काय वाकडं करणार? मी तुमच्यासाठी लढायला तयार आहे.'

ब्रिजभूषणने वयाच्या 33 व्या वर्षी राजकीय प्रवास सुरू केला होता. आता त्याचा हा वारसा त्याचा मुलगा करण सिंह पुढे नेत आहे. भाजपला समर्थन देण्याची विनंती करत ब्रिजभूषण म्हणाला की,

(Sports Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.