Brij Bhushan Sharan Singh : अखिल भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आंतरराष्ट्रीय किर्तीच्या महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचाराचे आरोप करत त्यांची त्वरित हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. यासाठी त्यांनी जंतर मंतरवर आंदोलन देखील सुरू केले.
या आंदोलनाची तीव्रता पाहून क्रीडा मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भारताची दिग्गज बॉक्सर मेरी कोम हिच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. आता या समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने वेळ वाढून दिला आहे.
चौकशी समिती ही क्रीडा संघटनांचे दैनंदिन कामकाज पाहते. या समितीला चार आठवड्यात ब्रिजभूष सिंह यांच्याविरूद्धच्या आरोपांबाबतची चौकशी करून अहवाल सादर करायचा होता. आता क्रीडा मंत्रालयाने या समितीला अहवाल सादर करण्यासाठी वेळ वाढवून दिली आहे. या समितीला आता त्यांचा अहवाल हा 9 मार्चपर्यंत सादर करायचा आहे.
पीटीआयला क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'क्रीडा मंत्रालयाने समितीला अहवाल सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. याबाबत समितीनेच विनंती केली होती.'
ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करत भारताचे पदक विजेते कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगाट, रवी दहिया आणि साक्षी मलिक यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यानंतर क्रीडा मंत्रालयाला ब्रिजभूषण यांच्याविरूद्धच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करावी लागली होती. पदक विजेत्या कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांना अखिल भारतीय कुस्ती परिषदेच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली होती.
ब्रिजभूषण सिंह हे भाजपच्या तिकिटावर खासदार देखील झाले आहेत. त्यांच्याविरूद्ध आता मेरी कोमच्या नेतृत्वात माजी कुस्तीपटू योगेश्वर दत्त, बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे, स्पोर्ट्स अथोरिटी ऑफ इंडिया चे सदस्या राधिका श्रीमन आणि राजेश राजगोपालन, बबिता फोगाट यांची समिती चौकशी करत आहे.
हेही वाचा : का वाढतात रिअल इस्टेटचे भाव?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.