Brij Bhushan Singh Controversy : बृजभूषण प्रकरणावर चित्रा वाघ गप्प का?

या अत्याचाराविरोधात राजधानी दिल्लीत महिला कुस्तीपटूंनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.
Brij Bhushan Singh Controversy
Brij Bhushan Singh Controversy Sakal
Updated on

Brij Bhushan Singh Controversy : महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Brij Bhushan Singh Controversy
Wrestlers Protest : बृजभूषण सिंह प्रकरणात IOA अध्यक्ष पी.टी. उशांची उडी; म्हणाल्या आम्ही निर्णय घेतलाय...

या अत्याचाराविरोधात राजधानी दिल्लीत महिला कुस्तीपटूंनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. यासंपूर्ण प्रकरणानंतर देशातील वातावरण ढवळून निघालेले असून, अनेक राजकीय पक्षांनी या विरोधात सरकारला प्रश्न विचारत अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, या प्रकरणावर भाजपकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Brij Bhushan Singh Controversy
Wrestlers Protest : क्रीडा मंत्र्यांची ब्रिजभूषण सिंहांविरुध्द मोठी कारवाई; राजीनाम्याबाबत दिला 24 तासांचा अल्टिमेटम

या प्रकरणाची गंभीर दखल घेत क्रिडा मंत्रालयाने बृजभूषण सिंह यांना अल्टीमेटम देत संपूर्ण घटनेवर उत्तर देण्यास सांगितले आहे.

दरम्यान, देशातील महिलांविरोधातील या प्रकरणात अनेक राजकीय पक्षांनी उडी घेत बृजभूषण यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातून या प्रकरणात मनसेनेदेखील उडी घेतली आहे.

Brij Bhushan Singh Controversy
Brij Bhushan Singh :बृजभूषण यांचा अजब दावा; ऑलिम्पिक पदक मिळवू शकत नाहीत म्हणून हे आंदोलन

चित्रा वाघ गप्प का?

दरम्यान, महिलांवरली अत्याचारांच्या घटनांवर दरवेळी महाराष्ट्र भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचं काम करतात.

मात्र, देशाचं नाव उंचावणाऱ्या महिला कुस्तीपटूंवर झालेल्या अत्याचारावर अद्यापपर्यंत चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

चित्रा वाघ यांच्या याभूमिकेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले असून, बृजभूषण सिंह भाजप खासदार असल्याने चित्रा वाघ यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Brij Bhushan Singh Controversy
Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनाला प्रियांकांचा फुल्ल सपोर्ट; म्हणाल्या, आरोपींची..

बृजभूषण वादात मनसेची उडी

भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर ऑलिम्पिकपटू महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

यापार्श्वभूमीवर दिल्लीत बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरू असतानाच आता या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे.

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी या सर्व प्रकरणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, बृजभूषण हा गुंड प्रवृत्तीचा आहे. ज्या महिला कुस्तीपट्टूंनी आरोप केले, त्यांच्यापैकी एक साक्षी मलिक आहे.

Brij Bhushan Singh Controversy
ICICI Bank Videocon Fraud : कर्ज फसवणूक प्रकरणात वेणुगोपाल धूत यांना दिलासा

असे लोक भाजपमधील असतील, तर २०२४ मध्ये कसं होईल. भाजपचं यावर काय म्हणण आहे. भाजप यावर मुग गिळून बसलं आहे. मात्र भाजप त्यांच्यावर कारवाई करेल याची शक्यता कमी आहे.

कारण बृजभूषण सिंग उत्तर प्रदेशातील शिक्षणसम्राट आहे. बाहुबली नेता आहे. यावर आता भाजपच्या महिला आघाडीनेच उत्तर द्यावं, असं आवाहन प्रकाश महाजन यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()