Brij Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहला होणार 5 वर्षांचा तुरुंगवास? पोलिसांच्या आरोपपत्रात अनेक धक्कादायक खुलासे

 Brij Bhushan Singh
Brij Bhushan Singh SAKAL
Updated on

Brij Bhushan Sharan Singh : भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 15 जून रोजी दिल्ली पोलिसांनी खासदार ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध लैंगिक छळ, गुन्हेगारी धमकी आणि पाठलाग या आरोपाखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्धच्या आरोपपत्रात म्हटले आहे की, आतापर्यंतच्या तपासानुसार, 6 कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांसाठी त्यांच्यावर खटला चालवला जाऊ शकतो आणि ब्रिजभूषण यांना शिक्षा होऊ शकते.

 Brij Bhushan Singh
ODI World Cup Tickets: ICC राहिले मागे अन् गांगुलीच्या भावाने जाहीर केली वर्ल्ड कपची तिकिटे, जाणून घ्या किंमत

तब्बल सहा महिने देशातील कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध आंदोलन करत होते. साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह पदक विजेत्या राष्ट्रीय कुस्तीपटूंनी दीर्घकाळ विरोध केला. क्रीडामंत्र्यांनी कुस्तीपटूंच्या तक्रारींची दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

 Brij Bhushan Singh
Wimbledon: जोकोविच 'विम्बल्डन'मध्ये सलग 32 वा सामना जिंकला, ह्युबर्ट हुर्काझवर चार सेटमध्ये मात

बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कलम 506 अंतर्गत गुन्हेगारी धमकी, 354 महिलेचा विनयभंग, 354 अ लैंगिक छळ आणि 354 डी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार आरोपपत्रानुसार 2 कलमांखाली भाजप खासदाराला 5 वर्षांपर्यंत तुरुंगात टाकले जाऊ शकते.

 Brij Bhushan Singh
WI vs IND : Hotstar, Sony Liv नाही तर 'या' अ‍ॅपवर फ्रीमध्ये पाहता येणार पहिला कसोटी सामना!

आरोपपत्रात पुढे असे म्हटले आहे की, तपासकर्त्यांनी 108 साक्षीदारांशी बोलले ज्यापैकी 15 पैलवान, प्रशिक्षक आणि रेफरी यांनी कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांची पुष्टी केली. कुस्तीपटूंनी त्यांच्या तक्रारींमध्ये लैंगिक छळाच्या 15 घटनांचा आरोप केला आहे. ज्यात चुकीचा स्पर्श करण्याच्या 10 भागांचा समावेश आणि धमकावण्याच्या अनेक घटना आहे.

दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रात सहा कुस्तीपटूंच्या विशिष्ट आरोपांशी संबंधित साक्षीदारांचे तपशीलवार पुष्टीकरणात्मक विधाने देखील समाविष्ट केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.