Brijbhushan Singh : भारतीय ऑलिंपिक संघटनेने कुस्तीपटूंची बाजू घेण्यास उशीर केला ;शरथ कमल

आंदोलनात सहभागी न होणाऱ्या खेळाडूंची मागणी; आशियाई स्पर्धेला प्राधान्य
Sharath Kamal
Sharath Kamalsakal
Updated on

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात भारतातील काही कुस्तीपटूंनी आंदोलन केले आहे; मात्र या आंदोलनामुळे भारतातील कुस्ती ठप्प झाली आहे. त्यामुळे कुस्तीपटूंच्या आगामी स्पर्धांच्या तयारीवरही परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता आंदोलनात सहभागी न होणाऱ्या कुस्तीपटूंनी साई केंद्र सुरू करण्याची मागणी केली असून आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी आम्हाला सरावाची गरज असल्याचेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पीटीआय संस्थेकडून हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

कुस्तीपटू नरसिंग यादव म्हणाला, आशियाई क्रीडा स्पर्धेची निवड चाचणी दोन महिन्यांवर आली आहे. राष्ट्रीय शिबिराला सुरुवात होण्याची गरज आहे. साई केंद्र खुले करण्याची गरज आहे. ज्युनियर कुस्तीपटूंना त्रास व्हायला नको.

ग्रीको रोमन (८२ किलो वजनी गट) प्रकारात सहभागी होणारा संदीप देशवाल म्हणाला, राष्ट्रीय शिबिर बंद आहे. त्यामुळे सरावावर परिणाम झाले आहेत. प्रशिक्षकांना विचारले असता, त्यांनाही शिबिर केव्हा सुरू होईल याबाबत माहीत नाही, अशी खंत त्याने पुढे बोलून दाखवली.

ग्रीको रोमन प्रकाराचे प्रशिक्षक हरगोबिंद सिंग यांनी सांगितले की, आशियाई चॅम्पियनशिप होऊन आता बराच कालावधी उलटून गेला आहे. राष्ट्रीय शिबिर सुरू होण्याची गरज आहे. साईच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता, त्यांच्याकडून योग्य ते उत्तर मिळत नाही, अशी निराशा त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. साईचे संदीप प्रधान यांच्याकडूनही मौन बाळगण्यात आले आहे.

कुस्तीपटूंना न्याय मिळावा :

प्रकाश करहाना

दरम्यान, लैंगिक शोषणाचे आरोप करीत नवी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना न्याय मिळायला हवा, असे स्पष्ट मत भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या ॲथलीट कमिशनचे सदस्य प्रकाश करहाना यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले,

मी कमिशनच्या वतीने बोलत नाही. माझे वैयक्तिक मत असे आहे की, कुस्तीपटू आपल्या हक्कासाठी लढत आहेत. लैंगिक शोषण हा गंभीर विषय आहे. तसेच हे महिला खेळाडूंचे प्रकरण आहे. भारतात अशा घटना घडल्यास भविष्यात युवा मुली खेळांकडे वळणार नाहीत. त्यामुळे या प्रकरणात कुस्तीपटूंना न्याय मिळायला हवा, असे त्यांना वाटते.

आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली.

पावसामध्येही कुस्तीपटूंनी आंदोलन कायम ठेवले.

भारतीय ऑलिंपिक संघटनेने कुस्तीपटूंची बाजू घेण्यास उशीर केला : शरथ कमल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()