Brijbhushan Singh: रॅली कॅन्सल झाल्यावर ब्रिजभूषणसिंग यांचे अयोध्येत शक्ति प्रदर्शन, शरयूनदीच्या काठी...

Wrestlers Protest Brijbhushan Singh
Wrestlers Protest Brijbhushan Singh sakal
Updated on

Wrestlers Protest Brijbhushan Singh : भाजप नेते आणि कैसरगंजचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह त्यांच्या ताकद दाखवत आहे. महिला कुस्तीपटूंच्या आरोपांनी घेरलेले भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह शक्तिप्रदर्शन करण्यासाठी अयोध्येत पोहोचले, मात्र रॅलीला परवानगी देण्यात आली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, या रॅलीच्या आयोजनाची जबाबदारी आमदार अजय सिंह आणि इतर सहकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. खाप पंचायतींच्या अल्टिमेटमनंतर 5 जून रोजी अयोध्येतील प्रस्तावित जनजागृती रॅली रद्द करण्यात आली. सध्या तरी ही रॅली चर्चेचा विषय राहिली आहे.

Wrestlers Protest Brijbhushan Singh
Wrestlers Protest : अखेर कुस्तीपटू गेले गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला, मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या चर्चेत काय केली मागणी?

रॅली कॅन्सल झाली तरी ब्रिजभूषण सिंह यांने अयोध्येत शक्ति प्रदर्शन केले, त्यानंतर अयोध्येतील शरयूनदीच्या काठावर पुजाऱ्यांनी वैदिक मंत्रोच्चारात आरती केली. सरयू जयंती सोहळ्याच्या समारोप समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते रविवारी संध्याकाळी त्यांच्या मूळ जिल्हा गोंडा येथून समर्थकांसह अयोध्येत पोहोचले.

ब्रिजभूषण शरण सिंह सोमवारी (5 जून) अयोध्येतील राम कथा पार्क येथे "जन चेतना महारॅली" आयोजित करणार होते, परंतु जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ते पुढे ढकलण्यात आले. अयोध्या रॅली पुढे ढकलल्यानंतर ब्रिजभूषण यांनी आता घोषणा केली आहे की ते 11 जून रोजी गोंडाच्या कर्नलगंज शहरात रॅली काढणार आहेत.

जो त्यांच्या लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. रॅलीत अयोध्येतील संत मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.

Wrestlers Protest Brijbhushan Singh
Ind vs Aus Playing-11: दिग्गज खेळाडूकडून WTC फायनलसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11ची घोषणा

भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना पाठिंबा देण्यासाठी अयोध्येच्या संतांनी 29 मे रोजी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (POCSO) कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली होती, ज्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॉक्सो कायद्याचा गैरवापर होत असून सिंग यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.