Candidates Chess: दहाव्या फेरीनंतरही विजेता ठरेना! गुकेश, नेपोनियात्ची पहिल्या स्थानावर कायम

Candidates Chess Tournament: यंदाच्या विश्‍व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कोणत्या खेळाडूचे आव्हान असेल, याचे उत्तर आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेच्या दहाव्या फेरीनंतरही मिळालेले नाही.
Ian Nepomniachtchi and D Gukesh
Ian Nepomniachtchi and D GukeshX/FIDE_chess
Updated on

Candidates Chess Tournament: जागतिक विजेता डिंग लिरेन याच्यासमोर यंदाच्या विश्‍व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कोणत्या खेळाडूचे आव्हान असेल, याचे उत्तर आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेतील (Candidates Chess Tournament) दहाव्या फेरीनंतरही मिळालेले नाही.

डी. गुकेश- इयान नेपोनियात्ची या दोन खेळाडूंमधील दहाव्या फेरीमधील लढत ड्रॉ राहिली. त्यामुळे दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी अर्धा गुण मिळाला.

आता गुकेश व नेपोनियात्ची हे दोन्ही खेळाडू सहा गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थानावर विराजमान आहेत. १४ फेरीनंतर या स्पर्धेचा विजेता ठरणार आहे. या स्पर्धेत विजेता ठरलेल्या खेळाडूला आगामी काळात होणार असलेल्या जगज्जेतेपदाच्या लढतीत डिंग लिरेनशी दोन हात करावे लागणार आहेत.

Ian Nepomniachtchi and D Gukesh
Candidates Chess: विदितचा नाकामुरावर रोमहर्षक विजय; गुकेश-प्रज्ञानंद लढत ड्रॉ

डी. गुकेश- इयान नेपोनियात्ची यांच्यामधील लढतीत दोन्ही खेळाडूकडून कोणताही वेगळा प्रयत्न बघायला मिळाला नाही. नेपोनियात्ची याला या स्पर्धेत आतापर्यंत एकाही लढतीत पराभवाचा सामना करावा लागलेला नाही.

एकाही लढतीत हार न सहन करणारा तो या स्पर्धेतील एकमेव खेळाडू आहे. गुकेशविरुद्धच्या लढतीत त्याने जोखीम पत्करली नाही. अखेर दोन खेळाडूंमधील ही लढत ड्रॉ राहिली.

आर. प्रज्ञानंद- विदित गुजराथी या दोन भारतीयांमध्ये सोमवारी लढत रंगली. प्रज्ञानंदला या स्पर्धेत फक्त गुकेशविरुद्धच्या लढतीत हार पत्करावी लागली आहे. इतर लढतींमध्ये त्याने छान खेळ केला आहे. ३९ चालींनंतर प्रज्ञानंद- गुजराथी यांच्यामधील लढत ड्रॉ राहिली.

अमेरिकन बुद्धिबळपटूंचा विजय

अमेरिकेच्या दोन बुद्धिबळपटूंनी दहाव्या फेरीत विजय साकारला. हिकारू नाकामुरा याने निजात एबासोव याला नमवले. तसेच फॅबियानो कॅरुअना याने फिरॉझा एलिरेझा याच्यावर मात केली. गुकेश व नेपोनियात्ची यांनी प्रत्येकी सहा गुणांची कमाई केली आहे.

त्यानंतर आर. प्रज्ञानंद, हिकारु नाकामुरा व फॅबियानो कॅरुअना यांनी प्रत्येकी ५.५ गुणांची कमाई केली आहे. विदित गुजराथी याने पाच गुण कमावले आहेत. गुकेश, नेपोनियात्ची यांच्यासह प्रज्ञानंद, नाकामुरा, कॅरुअना व गुजराथी यांना विजेतेपदाची संधी असणार आहे.

Ian Nepomniachtchi and D Gukesh
Candidates Chess : गुकेशने अव्वल मानांकित फॅबियानोला रोखले, मात्र गुजराथीचा सलग दुसरा पराभव

महिला विभागात चीनच्या खेळाडूंमध्ये चुरस

महिला विभागात चीनच्या खेळाडूंमध्ये कमालीची चुरस दिसून येत आहे. लेई टिंगजी व टॅन जोंगयी या चीनच्या बुद्धिबळपटूंनी प्रत्येकी ६.५ गुणांची कमाई करीत संयुक्तपणे पहिले स्थान मिळवले आहे. हा निकाल दहाव्या फेरीनंतरचा आहे.

दहाव्या फेरीच्या लढतीत लेई टिंगजी हिने ॲलेक्झँड्रा गोरिचकिना हिला पराभूत केले. ॲलेक्झँड्रा हिचा या स्पर्धेतील पहिलाच पराभव ठरला. दरम्यान, महिला विभागात भारतीय खेळाडूंना प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कोनेरु हम्पी हिला ४.५ गुणांची कमाई करता आलेली असून आर. वैशाली ३.५ गुणांसह तळाच्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.