Ranji Trophy Ajinkya Rahane : अजिंक्यने IPL लिलावासाठी थोपटले दंड; ठोकले द्विशतक

Ranji Trophy Ajinkya Rahane
Ranji Trophy Ajinkya Rahaneesakal
Updated on

Ranji Trophy Ajinkya Rahane : मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने हैदराबाद विरूद्धच्या रणजी सामन्यात दमदार द्विशतक ठोकले. आयपीएल 2023 साठीचा मिनी लिलाव हा अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. या लिलावात अजिंक्य रहाणे याचे काय होते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. यादरम्यान, अजिंक्य रहाणाने द्विशतकी खेळी करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचले.

अजिंक्य रहाणे हैदराबद विरूद्धच्या सामन्यात पहिल्या दिवशी 139 धावा करून नाबाद होता. त्याचवेळी अजिंक्य उद्या मोठी खेळी करण्याच्या बेतात असल्याचे जाणवत होते. अखेर फॉर्ममध्ये परतलेल्या अजिंक्यने द्विशतकी खेळी करत आपला कमबॅक मोठा केला.

Ranji Trophy Ajinkya Rahane
Suryakumar Yadav: कसोटीतही टी-20ची पॅटर्न; सूर्याच्या स्ट्राईकरेटने निवड समितीची बोलतीच बंद

मुंबईकडून पहिल्या दिवशी यशस्वी जैसवालने 162 धावांची दीडशतकी खेळी केली होती. तर अजिंक्य रहाणे 139 धावा करून नाबाद होता. जैसवाल बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणेने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत संघाला 450 चा टप्पा गाठून दिला. यादरम्यान त्याने आपले शतक देखील पूर्ण केले होते. अजिंक्य आणि सर्फराजने चौथ्या विकेटसाठी नाबाद 75 धावांची भागीदारी रचत मुंबईला दिवसअखेर 457 धावांपर्यंत पोहचवले.

Ranji Trophy Ajinkya Rahane
Team India: रोहित शर्माच्या कर्णधारपदाला धोका, राहुल द्रविडच काय...

दुसऱ्या दवशी पहिल्या सत्रात अजिंक्य रहाणे आणि सर्फराज खान यांनी आपला कालचाच फॉर्म कायम राखला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठीची भागीदारी 169 धावांपर्यंत वाढवली. अजिंक्य रहाणेने द्विशतक ठोकले. 261 चेंडूत केलेल्या 204 धावांच्या खेळीत अजिंक्यने 26 चौकार आणि 3 षटकार मारले. अखेर अजिंक्य 204 धावांवर बाद झाल्यानंतर सर्फराजने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यानेही शतकी खेळी करत संघाला 600 पार पोहचवले.

दुसऱ्या दिवशी लंचसाठी खेळ थांबला त्यावेळी मुंबईने 124 षटकात 5 बाद 636 धावांपर्यंत मजल मारली होती. सर्फराज खान 123 तर शम्स मुल्लानी 11 धावांवर नाबाद होता. मुंबईकडून पहिल्या डावात यशस्वी जैसवाल (162), अजिंक्य रहाणे (204) आणि सर्फराज खान (123*) यांनी शतकी खेळी केली. तर बऱ्याच काळानंतर रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने 80 चेंडूत 90 धावांची आक्रमक खेळी केली. मात्र त्याचे शतक अवघ्या 10 धावांनी हुकले.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()