नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटर आणि आलिशान गाड्या (Luxurious Car) यांचे एक अनोखे समिकरण आहे. रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी पासून विराट कोहली हे विदेशी आलिशान गाड्यांचे दिवाने आहेत. आता या यादीत भारताचा नुकताच कर्णधारपदाची माळ गळ्यात पडलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील सामील झाला आहे. त्याने नुकतेच लँम्बोर्गिनी उरूस (lamborghini Urus) आपल्या ताफ्यात सामील केली आहे. ही गाडी फक्त 3 ते 4 सेकंदात 100 किमीचा वेग पकडते. विशेष म्हणजे या गाडीच्या रंगाचा आणि भारतीय संघाचा विशेष संबंध आहे. (Captain Rohit Sharma buys Blue Color Luxurious lamborghini Urus)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्माने Lamborghini Urus साठी 3.15 कोटी रूपये खर्च केले आहेत. या गाडीचा रंग हा डार्क ब्लू किंवा Blu Eleos असण्याची शक्यता आहे. हा रंग भारतीय संघाच्या जर्सीच्या रंगासारखाच आहे. रोहितची ही ब्लू रंगाची पहिलीच गाडी नाहीये. त्याने यापूर्वी बीएमडब्लू (BMW M5) गाडीचा रंग देखील ब्लूच आहे. रोहितकडे टोयोटा फॉर्च्युनर, मर्सिडीस (Mercedes GLS 350d), बीएमडब्लू (BMWX3) या गाड्या देखील आहेत.
लँम्बोर्गिनी (Lamborghini Urus) गाडीत 4.4 लीटर टर्बो चार्ज V8 इंजिन आहे. ही गाडी 641 बीएचपी पॉवर, 850 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 8 स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशनयुक्त आहे. ही गाडी जगातील एक सर्वात वेगवान एसयुव्हींपैकी एक आहे. याचा टॉप स्पीड 305 किमी प्रती तास इतका आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.