SA vs NED : कॅप्टन असावा तर असा! तळातील फलंदाजांसोबत केल्या 140 धावा

SA vs NED
SA vs NED esakal
Updated on

SA vs NED : भारतात सुरू असलेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करत मोठा उलटफेर केला. यानंतर स्पर्धेतील छोट्या संघांकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

आज स्पर्धेतील पहिली 400 प्लस धावा करणारी दक्षिण आफ्रिका आणि नवखा नेदरलँड यांच्यात लढत होत आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेदरलँडचा दक्षिण आफ्रिकेने अपेक्षेप्रमाणे निम्मा संघ 82 धावांवर गारद केला. मात्र त्यानंतर नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्डने झुंजार खेळ करत कसलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा घाम काढला.

त्याने तळातील फलंदाजांना हाताशी धरत नेदरलँडच्या धावसंख्येत 140 धावांची भर घातली. एडवर्डने नाबाद 78 धावा केल्या.

SA vs NED
Pakistan Cricket Team : डेंग्यू - कोरोना चाचणी, पराभवानंतर पाकची अवस्था खराब; तीन खेळाडूंनी बाबरचं टेन्शन वाढवलं

धरमशाला येथील नयनरम्य स्टेडियममधील दक्षिण आफ्रिका विरूद्ध नेदरलँड सामना हा पावसाच्या व्यत्ययामुळे उशिरा सुरू झाला. सामन्याची षटके देखील कमी करण्यात आली. प्रत्येकी 43 षटकांच्या सामन्यात नाणेफेक जिंकून आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी आपल्या लौकिकास साजेशी गोलंदाजी करत नेदरलँडची अवस्था 5 बाद 82 अशी केली. एन्गिडी, रबाडा, येनसेन यांनी नेदलँडच्या टॉप ऑर्डरला सुरूंग लावला होता. आता वाटले की आफ्रिका यांना 100 - 150 मध्ये गुंडाळून हेच टार्गेट 20 एक षटकात पार करतील असा अंदाज वर्तवला जात होता.

SA vs NED
PCB Zaka Ashraf : झाका अश्रफ यांनी घेतली तातडीची बैठक, अहमदाबादमधील 'त्या' घटनांची आयसीसीकडे केली तक्रार

मात्र हा अंदाज नेदरलँडचा झुंजार कर्णधार स्कॉट एडवर्डने चुकीचा ठरवला. त्याने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत संघाला नाबाद 78 धावांची झुंजार खेळी केली. त्याने तळातील 8, 9 आणि 10 क्रमांकाच्या फलंदाजांना साथीला घेत 140 धावा जोडल्या. नेदलँडने 43 षटकात 8 बाद 245 धावा करत आफ्रिकेसमोर तगडे आव्हान ठेवले. आर्यन दत्तने 9 चेंडूत 23 धावा चोपत आपल्या कर्णधाराला उत्तम साथ दिली. एडवर्डने 69 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने 78 धावा केल्या. मेरवेने देखील 19 चेंडूत 29 धावांचे योगदान दिले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.